Facebook पोस्टवरून बेंगळुरूत ‘दंगल’ ! गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी, 30 जण अटकेत
बेगळुरू : वृत्त संस्था – बेंगळुरूत काही भागात मंगळवारी रात्री उशीरा जातीय दंगल उसळली. एका युवकाने कथित प्रकारे पैगंबरांबाबत अपमानकारक पोस्ट केली होती, ज्याचा परिणाम दंगल उसळण्यात झाला. सुमारे शंभर लोकांच्या जमावाने काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली. एवढेच नव्हे, डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्यावर सुद्धा जमवाने दगडफेक केली. मूर्ती उत्तर बेंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहे. दरम्यान, हे फेसबुक अकाऊंट हॅक करून समाजकंटकांनी हा प्रकार घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Congress MLA Srinivas Murthy's residence in Bengaluru vandalised, allegedly over an inciting social media post by his nephew. Karnataka Home Minister says, "Issue to be probed but vandalism is not the solution. Additional forces deployed. Action will be taken against miscreants." pic.twitter.com/Xa1q6SI6mG
— ANI (@ANI) August 11, 2020
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने सोशल मीडियावर ही वादग्रस्त पोस्ट केली होती, ज्यानंतर अल्पसंख्यांक समाजामध्ये संताप उसळला. यानंतर जमावाने आमदाराच्या घराची तोडफोड केली. याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले, प्रकरणाची चौकशी होत आहे. तोडफोडीने मार्ग निघू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, युवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते आणि त्याने या पोस्ट केल्या नव्हत्या, ज्यामध्ये कथित पोस्टमधून पैगंबरांचा अवमान करण्यात आला होता.
2 व्यक्तींचा मृत्यू, 60 पोलीस कर्मचारी जखमी
पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की, कथित सोशल मीडिया पोस्टवरून हिंसाचार उसळल्यानंतर बेंगळुरूच्या डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्यावर हिंसक जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सुमारे 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला रूग्णालयात दाखल केले आहे. बेंगळुरूत सीआरपीसी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
30 जणांना अटक
सदभावना यूथ सोशल वेल्फेयर असोसिएशन आणि बिलाल व अन्य संबंधित लोकांनी बेंगळुरूच्या डीजे हल्ली पोलीस ठाण्यात काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे बेंगळुरू पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, याप्रकरणी 30 लोकांना अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक केली जाणार आहे.