सरकारनं ‘फिक्स’ केली हँड सॅनिटायजर आणि फेस मास्कच्या ‘किंमत’, जाणून घ्या नवीन ‘दर’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या भितीमुळे मागणी वाढल्याने हँड सॅनिटायझर आणि फेस मास्कवर मनमानी किमती वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्याने सरकारने कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने या वस्तूंची किमती ठरवल्या आहेत. ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी किमतींची घोषणा केली.

केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार आवश्यक वस्तु कायद्यांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरण्यात येणार्‍य फॅब्रिकची किंमत तिच राहील, जी 12 जानेवारी 2020 ला होती. या आधारावर 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये प्रति मास्क आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपये प्रति मास्कपेक्षा जास्त असणार नाही.

कोरोना हायरस सर्वत्र पसरल्यानंतर बाजारात विविध फेस मास्क, त्याच्या निर्मितीसाठी लागणारी सामग्री आणि हँड सेनिटायजरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून या वस्तूंच्या किमती ठरवल्या आहेत.

तर हँड सॅनिटायजरच्या 200 एमएलच्या बाटलीची किरकोळ किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. तर अन्य आकाराच्या हँड सॅनिटायजरच्या बाटल्यांची किंमत याच प्रमाणात राहील. किमतींची ही मर्यादा 30 जून 2020 पर्यंत संपूर्ण देशात जारी राहील.

केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पसरल्यानंतर बाजारात मास्क आणि हँड सॅनिटायजरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. एरव्ही 10 ते 20 रूपयांना मिळणारा मास्क अनुक्रमे 110 आणि 120 रूपयांना विकला जात आहे. यामुळे सरकारने किमती ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.