COVID- 19 : 21 ते 40 वर्षापर्यंतचे लोक सर्वाधिक 52.63% संक्रमित

लखनऊ : मागील 24 तासांमध्ये 196 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 6548 रूग्ण कोरोना व्हायरसने संक्रमित सापडले आहेत. यापैकी 3698 रूग्ण ठीक होऊन घरी परतले आहेत. 170 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 2680 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. ही माहिती वैद्यकीय व आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव अमित मोहन प्रसाद यांनी अपर मुख्य सचिव गृह व माहिती अवनीश अवस्थी यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

926 मजूर संक्रमित सापडले
मागील 24 तासात आशा वर्करने नऊ लाख प्रवासी मजूरांचा सर्वे केला. यापैकी 926 मजूरांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली. त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहे. प्रमुख सचिव म्हणाले, 20 वर्षाच्या वयोगटात संसर्गाची टक्केवारी 18.33 आहे. तर हीच टक्केवारी 41 ते 60 वर्षाच्या वयात 22.67 आहे. मागील 24 तासात टेस्टींगसाठी 865 पूल घेण्यात आले आहेत. यापैकी 775 पूल 5-5 चे आणि 90 पूल 10-10 सॅम्पलसाठी घेण्यात आले. आरोग्य सेतू अ‍ॅप अ‍ॅलर्टवर संसर्ग रोग कंट्रोल रूम (18001805145) ला 35932 कॉल आले. यामध्ये 96 लोक संक्रमित आढळले.

देशांतर्गत उड्डाणांतर्गत आले 2807 प्रवाशी
ते म्हणाले, सोमवारी देशांतर्गत विमानसेवा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी 2807 प्रवाशी आले. यामध्ये 2007 येथीलच होते. ते सर्व 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहतील. 721 प्रवासी एक आठवड्याच्या आत परत जातील. त्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याची गरज नाही. या सर्व प्रवाशांची डिजिटल प्रणाली अंतर्गत माहिती घेण्यात आली आहे.