बँकेकडून तुम्हाला ATM कार्डवर कितीचा ‘विमा’ असतो माहित आहे का ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएम कार्डाचा वापर करणाऱ्या अनेक लोकांना माहिती नाही की त्यांच्या डेबिट कार्डवर मोफत अपघाती विमा सुविधा बँकेकडून देण्यात येते. या विम्याची रक्कम 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत असते. बँक याचा प्रचार करत नाही, त्यामुळे कोणत्याही दुर्घटनाग्रस्ताला या विम्याचा लाभ मिळत नाही. बँकेत खाते सुरु केल्यावर बँकेकडून मिळणाऱ्या किटवर छोट्या शब्दात याचा उल्लेख असतो ज्यावर ग्राहकांची नजर जात नाही.

एटीएम डेबिट कार्डवर ग्राहकांना मिळणाऱ्या अपघाती विम्याची लिमिट प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी असते. यासाठी बँकेची अट आहे की एटीएम कार्ड सुरु असावे आणि 90 दिवसात कमीत कमी एकदा त्यावरुन ट्रांजेक्शन व्हावे. या विम्याचा प्रचार न करण्याबाबत बँक आधिकाऱ्यांचा तर्क आहे की जेव्हा ग्राहक बँकेत खाते सुरु करतात तेव्हा त्यांना त्याची माहिती देण्यात येते.

एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड अजय गुप्ता यांनी सांगितले की एचडीएफसी बँकेत विविध कार्डवर विविध लिमिट आहे. प्लॅटिनम कार्डधारकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. पीएनबी मंडलीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक यशोदा नंद पांडेय यांनी सांगितले की त्यांच्या बँकेतून 50 हजारापासून 5 लाख रुपयांपर्यंत विमा ग्राहकांना देण्यात येतो. क्लेमसाठी खातेदारांला जेथे खाते आहे तेथे अर्ज करावा लागतो. एका महिन्याच्या आत विम्याची रक्कम कुटूंबाला देण्यात येते.

एटीएम कार्डधारकांना विम्याची माहिती नसल्याने बँकेत मरणोत्तर दावा करण्यात येत नाही. एका वर्षात एक बँकेत किती दावे करण्यात येतात हा प्रश्न विचारल्यावर बँक अधिकाऱ्यांनी मान्य केले की क्लेमपासून वाचण्यासाठी विम्याचा प्रचार प्रसार करण्यात येत नाही.

Visit : Policenama.com