चाहत्यानं सोनू सूदची केली ‘बिग बी’ अमिताभसोबत तुलना, अभिनेत्यानं दिलं ‘असं’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध केला आहे. सर्वजण सोनूचं कौतुक करत आहेत. अशातच एका चाहत्यानं सोनूची तुलना बिग बी अमिताब बच्चन सोबत केली. परंतु सोनूनं जे काही उत्तर दिलं त्यानं सर्वांचंच मन जिंकलं आहे.

एका चाहत्यानं लिहिलं की, जेव्हा सगळं काही ठिक होईल तेव्हा तुम्हाला प्रत्येक संडेला शुटमधून सुट्टी घ्यावी लागेल. कारण लोक तुम्हाला भेटायला येतील. सोनू सूद पुढील अमिताभ.

अनेकांना माहिती असेल की, अमिताभ बच्चन त्यांच्या घराबाहेर ज्याचं नाव आहे जलसा, चाहत्यांना रविवारी भेटत असतात. सध्या लॉकडाऊनमुळं त्यांचा हा उपक्रम बंद आहे.

चाहत्याच्या ट्विटनंतर सोनूनं त्याला खूप छान उत्तर दिलं. सोनूनं लिहिलं की, ते काय माझ्या घरी येतील मित्रा, मीच त्यांच्या घरी जााईन. खूप सारे आलू पराठे, पान, चहा हे उधार आहे माझ्या मित्रांवर.”

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like