15 वर्षाच्या मुलीवर वडिल अन् आजोबा करत होते बलात्कार, न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तमिळनाडूच्या थनजवुर जिल्ह्यात एका 15 वर्षाच्या मुलीवर तिचे वडिल आणि आजोबा बलात्कार करत होते, ज्यामुळे ती गरोदर राहिली. 25 आठवड्यांच्या गर्भवती मुलीची प्रकृती लक्षात घेता मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तिला गर्भपात करण्यास परवानगी दिली. कोर्टाकडून मुलीच्या मावशीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यात गर्भपात करण्याची परवानगी मागितली गेली होती. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या आईच्या निधनानंतर तिच्यावर तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

न्यायमूर्ती आर पोंगीनप्पन म्हणाले की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी अ‍ॅक्टनुसार 20 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत गर्भपात करण्यास परवानगी नाही, परंतु कलम 5 मध्ये अपवाद व्यवस्था आहे.

न्यायाधीशांनी कोर्टाच्या जुन्या आदेशांचा हवाला देत आणि थनजवुर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन अध्यक्ष असलेल्या वैद्यकीय समितीच्या शिफारशींचा उल्लेख करून गर्भपात करण्यास परवानगी देण्यात आली. समितीने म्हटले आहे की गर्भधारणा चालू ठेवणे बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोर्टाने म्हटले आहे की पीडितेच्या मानसिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन गर्भपात करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.

न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचाही उल्लेख केला की, जर पुरेसे कारण असेल तर निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधीचा गर्भही पाडता येऊ शकतो. कोर्टाने फौजदारी खटला मिळेपर्यंत भ्रूणचे नमुने जतन करण्याचे आदेश दिले.