‘विक्की डोनर’ अन् ‘बधाई हो’ यासारख्या चित्रपटांबद्दल आपल्या मुलांना काय समजवणार आयुष्मान ? अभिनेत्यानं दिली ‘ही’ मजेदार उत्तरे

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. ‘विक्की डोनर’ ने आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारा आयुष्मान पडद्यावर नेहमीच रोचक भूमिका साकारत असतो. आता त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने ‘विक्की डोनर’, ‘बधाई हो’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांविषयी आपल्या मुलांना तो काय सांगणार आहे याबद्दल सांगितले.

खरं तर, हा व्हिडिओ करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण यातील आहे. या शो दरम्यान करण जोरानने आयुष्मानला त्याच्या चित्रपटांबाबत प्रश्न विचारले, ज्यास आयुष्मान खुराणा ने मजेशीर उत्तर दिले. आयुष्मान खुराणा ने उत्तर दिले की ‘विक्की डोनर’ च्या बाबतीत तो सांगेल की, ‘बाळा, पप्पांच्या याच टॅलेंटमुळे आज तुझं अस्तित्व आहे.’ तसेच, आपला चित्रपट ‘बधाई हो’ च्या बाबत तो सांगेल की, ‘जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा आम्हाला एकटं सोडू नकोस.’

याशिवाय आयुष्मानने आपला चित्रपट ‘शुभ मंगल सावधान’ बाबत देखील एक मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला की मी या चित्रपटाबद्दल असे म्हणेन की जर असे असते तर तू इथे नसता. अभिनेत्याचे उत्तर ऐकल्यानंतर करण जोहरला हसू येते. वर्क फ्रंटबद्दल बघितले तर आयुष्मान खुराणा अखेर गुलाबो सीताबो या चित्रपटात दिसला होता. यात त्याने अमिताभ बच्चनसोबत काम केले होते. त्याच वेळी, मिळालेल्या वृत्तानुसार आयुष्मान अभिषेक कपूरसोबत आपला पुढचा चित्रपट करणार आहे. यात तो एका अ‍ॅथलीटच्या भूमिकेत दिसणार आहे.