रणवीर सिंगपासून इंस्पायर झाला हृतिक रोशन, दुबईत टॉवेल गुंडाळून फिरताना दिसला !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत चाहत्यांना त्याची हटके स्टाईल दिसत आहे. त्याची वेगळी स्टाईल पाहून चाहते अनेक गोष्टी बोलत आहेत. फोटोत हृतिकच्या एका पायाला पट्टी बांधलेली दिसत आहे. हृतिक दुबईत टॉवेल बांधून फिरत होता. यावेळचाच त्याचा हा फोटो आहे. खुद्द हृतिकनंच हा फोटो त्याच्या इंस्टावरून शेअर केला आहे.

हृतिकनं फोटो शेअर करत सांगितलं आहे की, त्याची स्टाईल कोणाकडून इंस्पायर आहे. फोटो शेअर करताना हृतिक म्हणतो, “ही फॅशन इंस्पिरेशन बहुतेक मी रणवीर सिंगकडून घेतली आहे.” लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्लॅक कॅप आणि रेड टीशर्ट घातला आहे. सोबतच त्यांना व्हाईट टॉवेल गुंडाळला आहे. त्यानं लुंगीप्रमाणे हा टॉवल वापरला आहे. त्यानं एक साईड बॅगही लटकवली आहे. त्यानं डोळ्यांना गॉगलही लावला आहे. त्याची ही स्टाईल खूपच युनिक वाटत आहे. हृतिकनं त्याचा हा फोटो इंस्टाग्रामच्या स्टोरीवरही शेअर केला आहे. स्टोरीवर हृतिक म्हणतो, “मला हे थोडं टाईट बांधायला हवं होतं.”

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो क्रिश 4 या सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच त्यांनी वॉर सिनेमात काम केलं आहे. टायगर श्रॉफ आणि हृतिक स्टारर वॉर सिनेमाही हिट झाला होता.