पोस्टामध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 19900 पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागाने स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण 10 पदांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2019 असेल.

स्टाफ कार ड्रायव्हर –
पद 10 (अनारक्षित – 05)

योग्यता –
1. मान्यता पात्र संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक
2. हलकी आणि जड वाहने चालवण्याचा वाहन परवाना आवश्यक
3. मोटर मेकॅनिज्मची माहिती असण्याबरोबरच वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा –
– किमान 18 ते जास्तीत जास्त 27 वर्ष वय
– एससी, एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट

वेतन –
निवड होणाऱ्या उमेदवाराला 19,900 रुपये वेतन म्हणून देण्यात येईल.

परिक्षा शुल्क –
100 रुपये परिक्षा शुल्क असणार आहे. जे तुम्हाला इंडियन पोस्टल ऑर्डरच्या माध्यमातून पाठवाले लागेल.

निवड प्रक्रिया –
योग्य उमेदवाराची निवड वाहन चालवण्याच्या चाचणीच्या आधारे करण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया –
– यासाठी उमेदवारांना https://www.indiapost.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर अपॉरच्युनिटी हा पर्याय असेल.
– त्यावर क्लिक केल्यानंतर येथे 16 Sep Notification for direct recruitment of 10(Ten) Staff Car driver posts at MMS, Patna असे शीर्षक असेल.
– येथे पदांची जाहिरात देखील देण्यात आली आहे.
– या जाहिरातीतील पात्रता काय आहे हे उमेदवाराने लक्षपूर्वक पाहावे.
– त्यानंतर अर्ज करुन संबंधित फोटोकॉपी जोडाव्या लागतील.
– हे अर्ज एका पाकिटात (लिफाफ्यात) टाकून दिशा निर्देशांकानुसार डाकच्या माध्यमातून निश्चित तारखेला योग्य पत्त्यावर पाठवावे.

येथे पाठवा अर्ज –
मॅनेजर, मेल मोटर सर्विस, जीपीओ कॅम्पस, पटना – 800001 या पत्यावर उमेदवारांना अर्ज पाठवावे लागतील.

महत्वाच्या तारखा –
डाकच्या माध्यामातून अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 नोव्हेंबर 2019
अधिक माहितीसाठी अर्जदार डाकच्या https://www.indiapost.gov.in अधिकृत वेबसाइटवरुन माहिती मिळवू शकतात.

Visit : policenama.com