सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा ! AIIMS च्या पॅनलचे प्रमुख म्हणाले – ‘खून नाही झाला, हे आत्महत्येचं प्रकरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू नेमकी हत्या होती की आत्महत्या, हा प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून एक रहस्यच बनलेला आहे. पण आता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनेलने हत्या-आत्महत्येचा सिद्धांत सोडविला आहे. सुशांतसिंग याचा मृत्यू हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे एम्सच्या पॅनेलने स्पष्ट केले आहे. एम्स पॅनेलचे प्रमुख असलेले डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत याची हत्या केली गेली नव्हती, तर ती आत्महत्येची घटना आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची तपासणी केल्यानंतर एम्सची टीम या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या पॅनेलने सुशांतसिंग राजूपत याच्या मृत्यू प्रकरणात हत्येच्या चर्चेला पूर्णपणे फेटाळले आहे. सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू ही आत्महत्येची घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एम्सच्या डॉक्टरांनी त्याचा तपास अहवाल 29 सप्टेंबरला सीबीआयकडे सादर केला होता. एम्सच्या डॉक्टरांच्या या पथकाने आपले काम केले आहे आणि आता सीबीआय रिपोर्टचा अभ्यास केल्यानंतर काही निष्कर्षावर पोहचेल.

सुशांतसिंग राजपूत याच्या हत्येच्या शंकांबद्दल सुशांतच्या कुटुंबीयांसह अनेकांनी सीबीआयला विनंती केली होती की, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. सुशांतसिंग राजपूत 14 जून रोजी आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या कुटूंबाने रिया चक्रवर्ती हीच्यावर आत्महत्येसाठी व पैशांच्या व्यवहाराचा आरोप केला आहे. सध्या सुशांत सिंग प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती तुरूंगात आहे.

सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे जाण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी प्रथम आत्महत्येचे प्रकरण मानले होते. तथापि, आत्महत्या करण्याच्या आरोपाच्या आधारे सीबीआय या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवेल. म्हणजेच आता सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा अ‍ॅगल आत्महत्येवर ठेवू शकते आणि त्यानुसार पुढील चौकशी करू शकते.

सुशांतसिंग राजपूत याचे वडील विकास सिंग यांनी दावा केला होता की, एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, सुशांतसिंग राजपूतचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे. विकास सिंग यांनी एम्सच्या डॉक्टरांचा हवाला देऊन हा दावा केला होता आणि त्याचा आधार त्याने पाठविलेले फोटो होते. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचे रहस्य सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन एजन्सी सीबीआय, ईडी आणि एनसीबीचे कार्यरत आहेत.