जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा रिकव्हरी रेट 7.1 % होता अन् आता 39.62 % : आरोग्य विभाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लॉकडाऊन असूनही कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. हा आकडा दोन दिवसांपूर्वी 1 लाखाच्या पुढे गेला आहे. कोरोना संसर्गाचा मृत्यूदर भारतात जगाच्या तुलनेत जास्त आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, कोविड-19मुळे जगभरात प्रति लाख 4.2 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, भारतात हा आकडा वेगळा आहे.

अग्रवाल म्हणाले, भारतात प्रति लाख केवळा 0.2 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगाची लोकसंख्या विचारात घेतली तर प्रति लाखात 62 लोक यामुळे प्रभावित झाले आहे. तर भारतात कोविड-19 मुळे प्रति लाखात केवळ 7.9 लोक प्रभावित आहेत.

लॉकडाऊनच्या वेळी रिकव्हरी दर 7.1%, आज 39.62%
त्यांनी म्हटले की, भारतात जेव्हा लॉकडाऊनला सुरूवात झाली तेव्हा रिकव्हरी दर 7.1 टक्के होता, दुसर्‍या लॉकडाऊनदरम्यान रिकव्हरी रेट 11.42 टक्के होता आणि नंतर वाढून 26.59 टक्के झाला. आज रिकव्हरी रेट वाढून 39.62 टक्के झाला आहे. देशात कोविड-19 च्या 61,149 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 42,298 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.

कोविड-19 चे ज्या रूग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामधील सुमारे 2.94 टक्क्यांना ऑक्सीजनची गरज आहे, तीन टक्के लोकांना आयसीयू आणि 0.45 टक्के लोकांना व्हेंटीलेटरची मदत हवी आहे.