‘या’ 6 संकेताद्वारे ओळखा तुमच्या लिव्हरला मदतीची गरज आहे?, लिव्हर फ्रेंडली 6 फुड कोणते, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. आपले शरीर प्रत्येक आजारापूर्वी किंवा काही बिघाड झाल्यानंतर अनेक संकेत देत असते. अशाच प्रकारे जर लिव्हरमध्ये काही बिघाड असेल तर तो ओळखण्याचे काही संकेत असू शकतात. हे संकेत आणि लिव्हर फ्रेंडली फुड कोणते ते जाणून घेवूयात…

हे आहेत संकेत
1 भूक न लागणे
2 वजन कमी होणे
3 कमजोरी
4 पोटा वेदना आणि सूज
5 थकवा
6 डोळ्यांचा पिवळेपणा

निरोगी लिव्हरसाठी हे फुड्स सेवन करा :

1 बीट :
बीटचा रस लिव्हरला ऑक्सीडेटिव्ह डॅमेज आणि सूजपासून वाचवतो. नैसर्गिक डेटोक्स एंजाइम वाढवतो. यातील नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडेंट्स हृदय निरोगी ठेवते.

2 अक्रोड :
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार, फॅटी लिव्हर डिसीज असल्यास ओमेगा – 3 युक्त अक्रोड सेवन करा. यामुळे लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह होते.

3 बेरी आणि क्रॅनबेरी :
ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी दोन्हीत एंथोसायनिन, अँटीऑक्सीडेंट असल्याने लिव्हर निरोगी राहते. एनसीबीआयनुसार 21 दिवस या फळांचे सेवन करावे.

4 हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्या सेवन केल्याने लिव्हरच्या आजूबाजूला फॅट जमा होत नाही.

5 मासे :
ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड हे सॅल्मन, सार्डिन, ट्यूना आणि ट्राउट सारख्या माशांमध्ये जास्त असते. यामुळे लिव्हर फॅट खुप कमी होते, सूज कमी होते.

6 चहा आणि कॉफी :
हे दोन्ही लिव्हरच्या एंजाइम सुधारते, फॅट कमी होते, जेवण सहज पचन होते, ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता.