नवजात बालकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आणेल ‘हा’ नवा आय ड्रॉप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आता नवजात बालकांमध्ये अँटीबायोटिकविरोधी बॅक्टेरियल संसर्गामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी एका नव्या आय ड्रॉपचा शोध लावण्यात आला आहे. बॅक्टेरियल संसर्गामुळे होणार्‍या या आजारामुळे नवजात बाळांच्या डोळ्यांची दृष्टी जाते. किंगस्टन यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या संशोधकांनी हा आय ड्रॉप शोधून काढला आहे.

आईकडून मुलांमध्ये पोहचतोय आजार

नायसेरिया गोनोरोहिया नावाचा बॅक्टेरियामुळे लैंगिकसंबंधी संसर्ग गोनोरोहिया होतो. हा बॅक्टेरिया दिवसेंदिवस त्या अँटिबायोटिकच्या बाबत विरोधी होत चालला आहे, ज्याद्वारे त्याचा उपचार केला जात होता. हा संसर्ग गरोदर मातेकडून बाळाकडे पसरते. हा बॅक्टेरिया नवजात बाळांच्या डोळ्यांना प्रभावित करतो.

नव्या अँटीमायक्रोबियल एजंट शोधला

किंगस्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांची टीम मोठ्या कालावधीपासून अँटीमायक्रोबियल एजंट मोनोकाप्रिनच्या क्षमतेवर अभ्यास करत होती. आता त्यास गोनोरोहिया संसर्गाच्या उपचारासाठी जुन्या निष्प्रभावी अँटीबायोटिकला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हा स्वस्त पर्याय असून जगतील कोणत्याही कोपर्‍यात हे औषध सहज बनवता येऊ शकते.

प्रमुख संशोधक डॉक्टर लोरी सिंडरने म्हटले, या औषधाच्या विरूद्ध प्रतिबंध निर्माण करणे बॅक्टेरियासाठी सहज होणार नाही. मोनोकाप्रिन एक मोनोग्लिसेराइड आहे. हे एक फॅटी अ‍ॅसिड आहे. संशोधकांनी याचे प्रात्यक्षित केले. मोनोकाप्रिनमध्ये एक असे एक शक्तिशाली एजंट आढळला जो हे संसर्ग दूर करू शकतो. प्रोफेसर रेड एलने यांनी म्हटले की, आता हे औषध ट्रायलसाठी पाठवले आहे. जर हे यशस्वी झाले तर जगभरात औषधाचे उत्पादन करण्याची परवानगी दिली जाईल.