‘कोरोना’च्या महामारीमुळं मानवरहित ‘गगनयान’ मिशन पुढं ढकललं, यावर्षी नाही भरणार ‘उड्डाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मानवरहित उड्डाण करण्यासाठी सज्ज असलेला भारताचा महत्वाकांक्षी गगनयान प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता ते 2021 मध्ये उड्डाण घेईल, कारण इस्रोने कोविड – 19 मुळे आपल्या योजनांना पुन्हा जारी केले आहे. मूळ स्वरूपात या मिशनचे नियोजन या वर्षाच्या शेवटी केले होते. इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, “आम्हाला देण्यात येणाऱ्या योजनेनुसार गगनयान मानव रहित उड्डाण यंदाच्या वेळापत्रकात नाही.

शास्त्रज्ञाने म्हटले कि, मानव रहित उड्डनास संभाव्यत: पुढच्या वर्षीपर्यंत वाढविल्यास, 2022 पर्यंत मानवांना अंतराळात पाठविण्याची कल्पना प्रभावित होईल. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, ‘सध्याच्या परिस्थितीमुळे यावर्षी मानवरहित उड्डाण शक्य होणार नाही. आम्ही जवळपास सुमारे पाच ते सहा मोहिमांची योजना आखत आहोत, ज्यात GiSAT-1 चा देखील समावेश आहे. ज्याचे प्रक्षेपण या वर्षाच्या सुरुवातीला स्थगित करण्यात आले होते. या मोहिमेचा तपशील नंतर जाहीर केला जाईल.

इस्रोचे अध्यक्ष के शिवन यांनी पुढे सांगितले कि, “गगनयानसाठी इस्रोच्या तयार योजनेनुसार मानव उड्डाणच्या आधी दोन मानवरहित उड्डाणे करावी लागणार आहेत. जी मानवांना जहाजात पाठविण्यापूर्वी सर्व प्रणालीची चाचणी घेतील. आता पहिले मानवरहित उड्डाण पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुढील वर्षी इस्रोला दोन मानवरहित मोहीम हाती घ्यावी लागतील.