‘वोडाफोन’ची ‘जिओ’ला टक्कर, १२९ आणि २२९ रुपयात २ जीबी डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओला टेलीकॉम क्षेत्रात आल्यानंतर अनेक कंपन्या रोज अनेक रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. तसेच कंपन्या आपले अनेक प्लॅन बदलत आहेत. याप्रमाणे वोडाफोन कंपनी देखील नवा प्लॅन घेऊन आली आहे तसेच इतर प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत.

वोडाफोनचा नवा २२९ रूपयांचा प्लॅन
वोडाफोनने २२९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या नव्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असणार आहे तर यात दिवसाला २ जीबी इंटरनेट डाटा देण्यात येणार आहे, ही या प्लॅनची खासियत आहे. याशिवाय अनलिमिडेट लोकल कॉल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग उपलब्ध असणार आहे. याशिवाय कंपनी दररोज १०० एसएमएस देणार आहे. याशिवाय वोडाफोनच्या ग्राहकांना प्ले अ‍ॅप मधून फ्री सेवा मिळणार आहे ज्यात लाईव्ह टीव्ही, सिनेमे, आणि विविध शो पाहता येणार आहेत.

१२९ रुपयांचा वोडाफोन प्लॅन –
वोडाफोन १२९ रुपये प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी २ जीबी डाटा फ्री देत आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आहे, यात पहिल्यांना १.५ जीबी डाटा देण्यात येत होता. परंतू इतर कंपन्यांचे प्लॅन पाहून कंपनीने देखील आपल्या पॅनमध्ये बदल केले आहेत. या ग्राहकांना लाईव्ह टीव्ही, मुवीज आणि इतर सेवांचा लाभ घेता येणार आहे.

जिओचा १४९ चा प्लॅन
हा प्लॅन २८ दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये एकूण ४२ जीबी डाटा मिळतो. यात प्रति दिवस १.५ जीबी डाटा मिळेल. डाटा बरोबरच यात अनलिमिडेट कॉल्स, १०० एसएमएस प्रति दिन मिळणार आहेत. १४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये माय जिओ, जिओ सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ क्लाऊडची सेवा मिळेत.

आरोग्यविषयक वृत्त –