बारामती निर्भया पथकाची इंदापूरात रोडरोमिओ वर धडक कारवाई

इंदापूर:पोलीसनामा ऑनलाईन 

बारामती तालुका दामिनी ( निर्भया ) महीला पोलिस  पथकप्रमुख अमृता भोईटे, त्यांचे सहकारी पथक  व इंदापूर पोलिस यांनी इंदापूर शहर व परिसरातील रोडरोमिओ वर धडक कारवाई करत १५ रोडरोमिओंना ताब्यात घेवुन त्यांचेवर इंदापूर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbf55db1-bdb5-11e8-bd2f-9d00af4983f6′]

 इंदापूर शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा काॅलेजमधील मुलींची छेड छाडीचे प्रकार, व शहरात रोडरोमिओंचा  शाळा काॅलेज भागातील वाढता सुळसुळाट  याचा बिमोड करण्यासाठी बारामती तालुका  महिला दामिनी पथक व इंदापूर पोलिस यांनी संयुक्त पणे रोडरोमिओ वर धडक कारवाईचा बडगा उगारत शुक्रवार दिनांक २१  रोजी इंदापूराती कला, विज्ञान व वाणिज्य विद्यालय व परिसरात धडक प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारून  पुढील पंधरा रोडरोमिओंना ताब्यात घेवुन त्यांच्यावर इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

सावकाराने महिलेचा विनयभंग करून मुलाला पळविले

रोहित ढावरे.इंदापूर, अजित गायकवाड.इंदापूर, निखिल साळुंखे.गलांडवाडी नं. २ ,सुनिल शेळके. इंदापूर, विशाल सावंत. शेटफळ हवेली, विकास फलफले. गलांडवाडी नं. १ , निहाल पठाण. नरूटवाडी, अण्णा काळे. वांगी. ता. करमाळा, विश्वजित बनकर. गोखळी, रोहित राऊत. निमगाव केतकी, प्रिन्स गुप्ता. इंदापूर, अजित रेडके व इतर दोन असे एकूण पंधरा रोडरोमिओ वर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केल्याची माहीतु इंदापूर पोलिस ठाणे अमंलदार अजिज शेख यांनी दिली.