रियल लाईफची ’हिंदी मीडियम’ : गरीब विद्यार्थ्याची महागडी कार, पोलखोल झाल्याने फॅमिली ‘फरार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातून एक फिल्मी स्टाईल प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या मुलाला प्रसिद्ध शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी एक कारनामा केला. पण जेव्हा त्याची पोलखोल झाली तेव्हा प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले.

श्रीमंत असूनही या व्यक्तीने कमी उत्पन्न गटातील असल्याचे भासवून आपल्या मुलाला एका प्रसिद्ध शाळेच्या नर्सरीत प्रवेश मिळवला. मात्र हा मुलगा महागड्या गाडीतून शाळेत येऊ लागल्याने शाळा प्रशासनाला शंका आली, आणि प्रकरणाची पोलखोल झाली.

हिन्दुस्तान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, शाळा प्रशासनाने शंका आल्यानंतर चौकशी केली असता मुलाचे आई-वडील श्रीमंत असल्याचे समजले. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मुलाला घेऊन दुसरेच लोक आई-वडील बणून आले होते.

हे प्रकरण कोर्टात पोहचले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने मुलाचे आई-वडील आणि आजोबासह सात लोकांना आरोपी केले आहे. मुलगा आपल्या आजीच्याच महागड्या कारने शाळेत येत असे. मात्र, आजोबांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे, कारण त्यांनी जबाब दिला की, त्यांना या प्रकरणाबाबत काहीही माहिती नव्हते.

प्रकरणाचा खुलासा होताच मुलाचे आई-वडील फरार झाले. यादरम्यान आणखी एक खुलासा झाला की, आरोपीने दुसर्‍या मोठ्या मुलाचा प्रवेशसुद्धा अन्य एका प्रसिद्ध शाळेत बनावट पद्धतीनेच मिळवला आहे. पोलिसांनी या प्रकरणीसुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आरोपीचा तपास सुरू आहे. कोर्टाने प्रकरणावर टिपण्णी करताना म्हटले की, हा गंभीर गुन्हा आहे. या आरोपींद्वारे आणखीही काही बनावट प्रकरणांचा खुला होऊ शकतो.