मुख्याध्यापिकेनं 10 वी च्या विद्यार्थीनीला 150 वेळा ‘उठाबशा’ काढायला लावल्या, मुलगी पोहचली हॉस्पीटलमध्ये

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूरमधील सरकारी निवासी शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेने दिलेल्या अमानुष शिक्षेमुळे दहावीच्या विद्यार्थिनीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहितीनुसार मुख्याध्यापिकेने दीडशेपेक्षा जास्त वेळा उठा-बशा काढण्याची शिक्षा विद्यार्थिनींना केली. ज्यामुळे विद्यार्थिनींच्या कंबर आणि पायात सूज आली होती. त्यांचे शरीर पूर्णपणे सुजले होते आणि असह्य वेदना झाल्यामुळे विद्यार्थिनींना चालणे, उठणे आणि बसण्यास त्रास होऊ लागला. जेव्हा या मुली वेदनांमुळे ओरडत रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा ही बाब उघडकीस आली.

चंद्रपूरपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या चिमूर गावात समाज कल्याण विभागाने चालविलेल्या शासकीय निवासी शाळेत दहावीत शिकणाऱ्या ३८ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिकेने अमानुष शिक्षा केली. कारण फक्त एवढेच कि, या मुली शाळेच्या असेंब्ली दरम्यान आवाज करत होत्या. ज्यामुळे असेंब्ली डिस्टर्ब होत होती. ज्यामुळे या मुख्याध्यापिकेने दहावीच्या ३८ विद्यार्थिनींना कान पकडून १५० पेक्षा जास्त वेळा उठा- बशा काढायला लावल्या. तेसुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर आणि प्रत्येक वर्गासमोर. मुख्याध्यापिकेने अशीही धमकी दिली कि, जर विद्यार्थिनींनी आपली शिक्षा पूर्ण केली नाही, तर त्यांना प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळणार नाहीत आणि मुलींना शिक्षा पूर्ण करण्यास भाग पाडले गेले.

विद्यार्थिनींनी सांगितले की, १८ फेब्रुवारी रोजी प्रॅक्टिकल होते. त्या दिवशी असेंब्ली सुरू झाली. मग आम्ही आमच्या खोलीत प्रॅक्टिकलचे पुस्तक घ्यायला गेलो. त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले. सर्व मुली उभ्या राहिल्या. प्रार्थना सुरू झाली तेव्हा शाळा आणि वसतिगृह एकाच इमारतीत असल्यामुळे आमचे प्रकल्प पुस्तक घेण्यासाठी आम्ही दुसर्‍या मजल्यावर जात होतो. मग आमच्या शूज आणि चप्पल यांच्या आवाजाने असेंब्लीतील इतर विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी आम्हाला शिक्षा केली. प्रत्येक वर्गात ५०-५० उठा-बशा काढण्यास सांगितले. पहिल्यांदा १०, त्यानंतर २० आणि त्यानंतर ३०. हे करत प्राध्यापकांनी सांगितले कि, जोपर्यंत थांबा असे म्हणत नाही तोपर्यंत शिक्षा सुरु ठेवायची.

अशा प्रकारे, आम्ही मुलींनी १५० हून जास्त उठा – बशा काढल्या आणि आम्हाला चांगले-वाईट पण सुनावले. मुली रडत होत्या, तरीही प्राध्यापिका काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर त्या असेही म्हणाल्या कि, प्रॅक्टिकल होणार नाही. प्रत्येकाला शून्य गुण मिळतील. दुसर्‍या दिवशी प्रत्यकीला खूप त्रास होऊ लागला, मग वरदान मॅडम आम्हाला दवाखान्यात घेऊन गेल्या. आम्ही ६ मुली दवाखान्यात गेलो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलींची कंबर आणि पायात जास्त सूज आल्याने त्यांना चालण्यास त्रास होत आहे. संपूर्ण प्रकरण समजल्यानंतर डॉक्टरांनी पोलिस व शिक्षण विभागाकडे तक्रार केली.

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, शाळेतून काही विद्यार्थिनी माझ्याकडे आल्या. एकूण ६ मुली होत्या.त्यांनी सांगितले की, मॅडमने त्यांना शिक्षा दिली आहे. त्यांची शिक्षा इतकी कठोर होती कि, तपासणी केली असता त्यांचा पाठीचा भाग पूर्णपणे सूजला होता तसेच पायातही सूज आली. त्या रडत होत्या. मी त्यांच्यावर उपचार केले. त्यांनतर पोलीस आणि शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली.

You might also like