मधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी एकाचा मृत्यू होत असल्याचं ‘स्टडी’मध्ये स्पष्ट

फ्रान्स : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना रूग्णांची संख्या देशभरात दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, यातून बरे होणार्‍यांची संख्या सुद्धा मोठी असल्याने थोडा दिलासा मिळत असला तरी पुवीचे काही आजार असलेल्या रूग्णांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अशाच एका अभ्यासानुसार कोरोनाच्या 10 रुग्णांपैकी 1 रुग्ण ज्याला मधूमेह देखील आहे, त्याचा हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर 7 दिवसात मृत्यू होऊ शकतो. तर, पाच रुग्णांपैकी एकाला व्हेंटिलेटवर ठेवण्याची आवश्यकता भासू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

मधुमेह असताना कोरोना झालेल्या रूग्णांबाबत संशोधकांनी हे संशोधन 10 ते 31 मार्च दरम्यान फ्रान्समधील 53 हॉस्पिटल्समध्ये केले होते. डायबेटोलॉजिया या जनरलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी 1,317 कोरोना-19 रूग्णांची माहितीचा आधार घेण्यात आला. संशोधनात फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ नॅनेट्समधील संशोधक सहभागी झाले होते. या संशोधकांनी म्हटले की, या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांमध्ये टाइप-2 मधुमेह आहे, तर 3 टक्के रुग्णांना टाइप-1 मधुमहे आढळऊन आला. उर्वरित रुग्णांमध्ये इतर काही प्रकारचा मधुमेह आहे.

संशोधकांनी सांगितले की, अभ्यास करण्यात आलेल्या रुग्णालयातील दोन तृतीयांश कोरोना संक्रमित रुग्ण हे पुरूष आहेत, आणि त्यांचे सरासरी वय 70 वर्षे आहे. ब्लड शुगरचे प्रमाण कमी-जास्त असल्याचा फारसा परिणाम होत नाही, मात्र या परिस्थितीत मधुमेह आणि जास्त वय असलेल्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे.

47 टक्के रुग्णांच्या डोळे, मूत्रपिंड आणि मज्जातंतूमध्ये काहीशी गुंतागुंत दिसून आली. तसेच 41 टक्के रुग्णांच्या हृदय, मेंदू आणि पायमधील रक्तवाहिन्यांसंबधी मायक्रोव्हॅस्क्यूलर समस्या दिसून आली आहे. तसेच या संशोधनानुसार 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांच्या गटापेक्षा 75 पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 14 पट जास्त आहे.

अभ्यास केलेल्या रुग्णांमध्ये 5 रुग्णांपैकी एकाला सातव्या दिवशी अतिदक्षता घेण्यासाठी व्हेंटिलेटवर ठेवावे लागले. आतापर्यंत 10 पैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी 18 टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मायक्रोव्हॅस्क्यूलर कॉम्प्लिकेशन्समुळे सातव्या दिवसापर्यंत मृत्यू होण्याचा धोका दुप्पट झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like