Sub-Registrar Offices In Pune | नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे : अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sub-Registrar Offices In Pune | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २२ एप्रिल २०२३ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे (IGR Hiralal Sonwane) यांनी दिले आहेत. (Sub-Registrar Offices In Pune)

 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठराविक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुरू ठेवावयाची कार्यालये निश्चित करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांच्या सह जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत. (Sub-Registrar Offices In Pune)

 

पुणे शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवार २२ एप्रिल आणि रविवार २३ एप्रिल रोजी शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
यामध्ये सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. १७ आणि
युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २२ ही कार्यालये दुपारी १ ते रात्री ८.४५ वा.,
युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २१ आणि सिद्धी टॉवर दापोडी येथील
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २५ ही कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी ३.३५ वा. पर्यंत,
शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत येथील
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २३ कार्यालय सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ वा. पर्यंत सुरू राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे

 

Web Title :- Sub-Registrar Offices In Pune | Inspector General of Registration and Control of Stamps Hiralal Sonwane: Order to continue the offices of Sub-Registrar along with Akshaya Tritiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Rupali Chakankar | ‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण