भाजप खासदाराची पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘PM मोदींनी गडकरींबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान देशातील कोरोनाच्या स्थितीवरून काही दिवसापूर्वी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी ट्वीट करून मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदीला लक्ष्य केले आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. यावरून खासदार स्वामींनी चार दिवसापूर्वी एक ट्वीट केले होते. भारताने इस्लामिक आणि ब्रिटिश घुसखोरांचाही सामना केला आहे. तसेच देश कोरोनाशी दोन हात करेल. वेळीच योग्य पावले उललली गेली नाही, तर आपल्याला कोरोनाच्या आणखीन एका लाटेचा सामना करावा लागेल. कोरोना संकटात पंतप्रधान कार्यालय काहीच कामाचे नाही. सध्याची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली होती. त्यावर खासदार स्वामीनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. मी दिलेला प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होते. पण आता सरकारला सुप्रीम कोर्टाचे ऐकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव असल्याची गंभीर टीका खासदार स्वामींनी केली आहे.