कौतुकास्पद ! 4 भाऊ बहीण 3 वर्षात झाले IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आम्ही तुम्हाला उत्तरप्रदेशातील प्रतापगडमधील लोकेश मिश्रा आणि त्यांच्या तीन भावा बहिणींच्या यशाची कहाणी सांगणार आहोत. ज्या आईवडिलांची चारही मुले सरकारी सेवेत आहेत त्यांच्या आनंदाला किती उधाण येईल याचा विचार देखील कुणी करू शकत नाही. लोकेश मिश्रा आणि त्याच्या चार भावा बहिणींनी तीन वर्षाच्या अंतरात IAS अधिकारी झाले. अनिल मिश्रा आणि कृष्णा मिश्रा यांची चार मुले योगेश, लोकेश, क्षमा आणि माधवी अशी या चार मुलांची नावे आहेत.

अनिल मिश्रा हे आपल्या चार मुलांसह प्रतापगडमध्ये राहतात. त्यांना योगेश, लोकेश, क्षमा आणि माधवी अशी चार मुले असून दोन खोल्यांच्या घरात राहतात. मोठे झाल्यानंतर चौघाही भावा बहिणींनी सरकारी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. या भावा बहिणींमध्ये सर्वात आधी 2013 मध्ये योगेश याने सिविल सर्विस एग्जाम पास केली. त्यानंतर माधवी हिने 2014 मध्ये 62 वि रँक मिळवत या परीक्षेत यश मिळवले. याचदरम्यान लोकेश याने देखील मुख्य परीक्षा पास करत या परीक्षेत यश मिळवले. लोकेशने इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यामुळे त्याला या परीक्षेत इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा फार उपयोग झाला. लोकेशने समाजशास्त्र या विषय ऑप्शनल घेतला होता. त्यानंतर लोकेश याने 2015 मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करत 44 वी रँक मिळवत परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर त्याचवर्षी घरातील सर्वात छोटी असलेल्या क्षमा हिनेदेखील या परीक्षेत यश मिळवत 172 वी रँक मिळवत यश मिळवले. यावेळी या यशाविषयी बोलताना तिने म्हटले कि, आम्ही सर्व जण एकमेकांची काळजी घेत असून प्रचंड मेहनत आणि आमच्या इच्छाशक्तीमुळे आम्हाला हे यश मिळाले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके