Sudhakar Badgujar-Salim Kutta Case | सुधाकर बडगुजर आणि गुंड सलीम कुत्ता प्रकरणावर येरवडा कारागृहाची महत्त्वाची माहिती

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता 2016 पासून येरवड्यातील अंडा सेलमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sudhakar Badgujar-Salim Kutta Case | मुंबई बॉम्बस्फोटात (Mumbai Bomb Blast Case) खटल्यातील दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा साथीदार आणि जन्मठेप शिक्षा (Life Imprisonment) झालेला सलीम कुत्ता हा 2016 पासून येरवडा कारागृहातील (Yerawada Jail) अंडासेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती येरवडा कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली आहे. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात (Legislative Assembly) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाचा सादर केलेला व्हिडिओ 2016 पूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sudhakar Badgujar-Salim Kutta Case)

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीर शेख (Sudhakar Badgujar-Salim Kutta Case) हा पॅरोलवर सुटला होता. तेव्हा शिवसेनेच्या उठाबा चे नेते सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्यासोबत पार्टी केल्याचा फोटो दाखवत भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आरोप केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यानी याची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली होती.

याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, सलीम कुत्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील मुख्य
आरोपी आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2016 पर्यंत त्याला नाशिक कारागृहात ठेवले होते.
तेथे असताना त्याला पॅरोलवर सोडले होते. त्यानंतर त्याला 16 डिसेंबर 2016 पासून येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये
ठेवण्यात आले आहे. येरवडा कारागृहात असताना त्याला पॅरोलवर सोडण्यात आलेले नाही, असा खुलासा येरवडा
कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारी टोळी गजाआड, दागिने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या

Pimpri-Chinchwad PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नियोजित पुनावळे घनकचरा प्रकल्प रद्द, मंत्री उदय सामंत यांची माहिती