Sudhir Khatu Joins Shivsena UBT | भाजपा नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश ! उद्धव ठाकरेंनी दिला धक्का, म्हणाले – ‘हुकुमशाहीची वळवळ…’

मुंबई : Sudhir Khatu Joins Shivsena UBT | भाजपाचे उत्तर मध्य मुंबईचे सचिव सुधीर खातू यांनी शेकडो कार्यकत्र्यांसह उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे गटाने भाजपाला हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. (Sudhir Khatu Joins Shivsena UBT)

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर खातू आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, राजकारणातील प्रवाह हा विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात असतो. पण सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. (Sudhir Khatu Joins Shivsena UBT)

सुधीर खातू यांचे कौतुक करताना आणि राज्यातील जनतेला आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधारी पक्षातून तुमचा प्रवास विरोधी पक्षात नव्हे तर देशप्रेमी आणि खऱ्या हिंदुत्ववादी पक्षाकडे झाला आहे. तुम्ही जे बोलला तीच भावना महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातील तमाम हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत ते एकवटले पाहिजेत. आता नाही तर कधीच.

ठाकरे म्हणाले, आता हुकुमशाहीची वळवळ गाडली नाही तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही.
देशप्रेमाला अर्थ राहणार नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे.
जास्त आता बोलत गेलो तर दसऱ्याला काय बोलणार? बोलायला खूप विषय आहेत त्यावर मी बोलणारच आहे.

ठाकरे म्हणाले, तुमच्या हातातील भगव्यावर मशाल चिन्ह आहे. हा भगवा म्हणजेच मशाल आहे.
हीच मशाल, हाच भगवा देशाला दिशा दाखवणार आहे. अत्याचाराला जाळण्याची ताकद त्याच्यात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sikkim Flood Update | दुर्देवी ! सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे शहीद