Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता नाही’ – सुधीर मुनगंटीवार

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाइन – Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
आजच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मोदी – पवार (PM Modi-Sharad Pawar Meeting) यांची जवळपास पंचवीस मिनिटे पंतप्रधान कार्यालयात (PMO Office) ही भेट झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ईडीची छापेमारी होत आहे. यावरुनही चर्चा झाली असल्याची चर्चा आहे.
यावरुन भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena)

 

मागील अनेक दिवसांपासून राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे.
दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.
यानंतर आता पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवरुन सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ”शिवसेनेशी कटुता असली, तरी राष्ट्रवादीशी नाही असे सांगत चर्चेला अधिक वाव मिळेल याची काळजी घेतली आहे.
तसेच, वैचारिक मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत,” असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. (Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena)

दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भेटीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
अनेक नेत्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar),
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Janyat Patil) यांनी भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | BJP leader sudhir mungantiwar says shiv sena committed dishonesty there is no bitterness between bjp and ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा