भारताशी ‘पंगा’ घेणं इमरान सरकारला पडलं महागात ! आता पाकिस्तानच्या लोकांना मोजावी लागतीय किंमत

नवी दिल्ली: रमजान जवळ येत आहे. अशा परिस्थितीत रमजान(पाकिस्तान) या वर्षी सुस्त होऊ शकेल. कारण पाकिस्तामधील जनतेला महागाईचे मोठे ओझे सहन करावे लागणार आहे. पाकिस्तानमध्ये साखर प्रतिकिलो १०० रुपये दराने विकली जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान सल्लागार शहजाद अकबर यांनी पत्रकार परिषदेत साखरेच्या वाढत्या किंमतींना ”सट्टेबाजांचे काम” म्हणून संबोधित केले आणि म्हणाले, ‘सट्टेबाज कृत्रिमरीत्या साखरेच्या किंमतीला वाढवतात, परंतू हे प्रकरण काही वेगळेच आहे.’ खरे तर पाकिस्तानी सरकारी ट्रेंडिंग कंपनी TCP ने सोमवारी ५०,००० टन पांढऱ्या साखरेच्या आयातीसाठी जागतिक निविदा काढली आहे, परंतू ही आयात भारतासारख्या बंदी घातलेल्या देशांकडून करता येणार नाही. भारताच्या साखर उद्योगाने या निर्णयाला शेजारच्या देशासाठी दुर्दैव्य म्हंटले आहे.

साखरेची किंमत १०० PKR पर्यंत पोहोचली
पाकिस्तानमध्ये यंदा साखर उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी आणि किरकोळ दराला आळा घालण्यासाठी साखर आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानमध्ये साखरेची किंमत १०० PKR (पाकिस्तानी रुपये) वर पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने भारतावरून साखर आणि कापसाची आयात करण्याची परवानगी दिल्यानंतर, अचानक दोन्ही देशांत व्यापार सुरु होण्याची अपेक्षा होती. परंतू नंतर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने निर्णय पालटला. TCP ने ५०,००० टन साखरच्या आयातीसाठी निविदा जारी करत म्हणाले, हे स्पष्ट केले आहे की पांढऱ्या साखरेची आयात इस्राईल अथवा अन्य कोणत्याही प्रतिबंधित देशांमधून झाली नाही पाहिजे.

भारताकडून साखर घावी लागेल
साखर उद्योग संघटनेने म्हंटले आहे की, पाकिस्तानने जर भारताशी व्यापार सुरु केले तर स्वस्त साखर मिळू शकते आणि येत्या रमजान महिन्यांपूर्वी येथे किंमती नियंत्रित करता येतील. साखरेच्या मोठ्या तुटवड्याने लढत असलेल्या पाकिस्तानला भारताकडून साखर आयात करून मिळू शकते.