सांगली : कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील येथील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक केलेल्या एका आरोपीने बुधवारी रात्रीच्या दरम्यान बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

अधिक माहितीनुसार, दीपक आवळे याला ६ महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर तो तुरुंगात होता. तुरुंगातील बाथरूममध्येच त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केले आहे. हि घटना पोलीस दलात समजल्यावर तात्काळ दिपकला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान दिपकने काही दिवसाअगोदर आपल्या परिवाराला आणि मित्रांना एक पत्र लिहिले होते, कोणीही गुन्हा करू नका, तुरुंगातील दिवस वाईट असतात. बाहेर आल्यानंतर सुधारायची इच्छा असून त्यासाठी काही दिवस सांगलीबाहेरही जाणार असल्याचं त्याने म्हटलं होत. तर दिपकने आत्महत्या का केलीय याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.