Sujat Ambedkar | सुजात आंबेडकर यांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान; म्हणाले – ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसेच्या (MNS) पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (Masjid Speakers) हटवण्याची मागणी करत  मोठ्या प्रमाणात भोंगे लावले तर मी त्या ठिकाणी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायला लावेल. राज ठाकरे यांच्या विधानानंतर सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी थेट राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तुमच्या विधानाला 100 टक्के पाठिंबा, आधी अमित ठाकरेंना (Amit Thackeray) हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी म्हटले आहे.

 

सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) म्हणाले, काल कोणीतरी एक वक्तव्य केलं, की जर मोठे भोंगे मशिदीवर लावले तर मी पोरांना हनुमान चालीसा म्हणायला तिकडे लावेल. तुम्ही सर्वांनी हे वक्तव्य ऐकलं असेल. माझा तुमच्या वक्तव्याला 100 टक्के पाठिंबा आहे. फक्त एक गोष्ट आहे. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा. मला एकही बहुजन (Bahujan) मुलगा तिकडे नको.

 

ते पुढे म्हणाले, मला एकही बहुजन मुलगा तिकडे नकोय, जे हनुमान चालीसा बोलायला तिकडे जाणार आहेत
त्यांनी टी-शर्ट काढून जानवं दाखवा आणि मग हनुमान चालीसा बोलायला जा.
सुजात आंबेडकर यांनी दिलेलं आव्हान आता अमित ठाकरे स्वीकारणार का?  यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे ?
मुंबई (Mumbai) तसचे मुंब्रा (Mumbra) येथील झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू
असल्याने त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना (PM) करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा,
अशा मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे (State Government) केली.
सरकारने भोंगे उतरवले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवा,
असा आदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिला. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु
झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

 

Web Title :- Sujat Ambedkar | sujat ambedkar open challenge to raj thackeray saying first ask amit thackeray to say hanuman chalisa
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर, डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !