Sujay Vikhe | भाजपा खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याने खळबळ! ”रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ…”

नगर : पोलीसनामा ऑनलाईन – रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत. वेळ आल्यावर हे काय करतात हे सगळ्यांना पुराव्यांसह दाखवेन, असा इशारा भाजपाचे खासदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे पूत्र सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी जाहीर सभेत दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विखेंचा (Sujay Vikhe) रोख नेमका कुणाकडे, या चर्चेला उधाण आले आहे.

सुजय विखे म्हणाले, कुणाचे खाते कोणत्या बँकेत आहे, कोण कुठे जाते, कोण रात्री बाहेर पडते, कुणाच्या घरी जाते हे
मला पूर्णपणे माहिती आहे. माझ्याकडे याचे व्हिडीओ शुटिंगही आहे.

सुजय विखे (Sujay Vikhe) पुढे म्हणाले, मी ६ महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं ठेवली आहेत. हे काय करतात, काय नाही
हे सगळ्या पुराव्यांसह दाखवेन. फक्त त्यांना एकदा उभे राहू द्या. माझा फार छोटा प्रश्न आहे की, हे साडेचार वर्षे कुठे होते.

सुजय विखे म्हणाले, माझ्याकडे सगळ्यांची उत्तरे आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मी कशी भाषणं करतो.
त्यामुळे मला ते सांगायची गरज नाही. वेळ आल्यावर सर्व व्हिडीओ दाखवणार आहे. आरोप करणाऱ्यांचे कपडेही ठेवणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…