‘त्या’ प्रकरणी माफी मागण्यासाठी विखे – पाटील खा. गांधींच्या निवासस्थानी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना खा. दिलीप गांधी यांना जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला होता. त्यामुळे अपमानित झाल्याने खा. गांधी चिडले होते. त्यांची माफी मागण्यासाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील खा. दिलीप गांधी यांच्या देवेंद्र बंगल्यावर जाऊन त्यांनी माफी मागितली.

खा. दिलीप गांधी यांचा पक्षातील अपमान काही कमी व्हायला तयार नाही. त्यांना वारंवार अपमानित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान खा. गांधी हे त्यांनी केलेली विकासकामे सांगत असताना जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी त्यांना भाषण थांबवण्याचा इशारा केला. त्यामुळे खा. गांधी चांगलेच संतप्त झाले होते. व्यासपिठावरच सुजय विखे यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांच्या सभेनंतर सायंकाळी सुजय विखे यांनी खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची माफी मागितली. झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते खा. गांधी यांना म्हणाले.

लोकसभा उमेदवारीचा पत्ता कट केल्यापासून खा. दिलीप गांधी यांना पक्षसंघटनेत अपमानित केले जात आहे. त्याचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावर आला. तेथेही जिल्हाध्यक्षांनी त्यांना भाषण थांबवण्यास सांगितले होते. त्यामुळे गांधी यांना सर्वांसमोर अपमानित केल्याने ते चांगलेच संतापले होते. त्यामुळेच विखे पाटील यांनी त्यांच्याकडे माफी मागितली.