PM नरेंद्र मोदींना ‘चुकी’चं समजणार्‍या सुल्ताननं सांगितले स्वतःचे विचार बदलल्याची संपूर्ण स्टोरी

गांधीनगर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरातच्या गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षान्त सोहळ्यात सहभागी झाले होते. याच विद्यापीठाच्या एका जुन्या विद्यार्थ्याने पंतप्रधानांचे स्वागत आपल्यासोबत त्यांच्या भेटीचा उल्लेख करत केले. विद्यार्थ्याचे नाव सुलतान अलीमुद्दीन आहे.

अलीमुद्दीनने पीएम मोदी (तेव्हाचे गुजरातचे सीएम) यांच्याशी झालेल्या त्याच्या पहिल्या भेटीचा उल्लेख करताना लिहिले – ’आज माझ्या युनिव्हर्सिटीचा दीक्षान्त सोहळा आहे, जेथे पीएम नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे आहेत. पीडीपीयूचा सर्वांत जुना विद्यार्थी म्हणून माझ्याकडे अनेक आठवणी आहेत. मी मोदी सरांसोबत अनेक मीटिंग्ज केल्या आहेत. एकदा मी त्यांना पवित्र कुराणसुद्धा भेट दिले होते.

मोदी सरांशी पहिली चर्चा योगायोगाने झाली
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एकापाठोपाठ एक ट्विट करत अलीमुद्दीनने लिहिले, नरेंद्र मोदी सरांसोबत माझी पहिली चर्चा योगायाेगाने झाली, जेव्हा मी त्यांना त्यांच्या सरकारच्या कामकाजावर एक ट्विट केले आणि मला सीएमओ, गुजरातमध्ये एका सविस्तर बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांच्यासोबत माझ्या सहा भेटींपैकी ही पहिली भेट होती. यामध्ये त्यांच्यासोबत मेहसाणा येथे जाण्याच्या कार्यक्रमाचासुद्धा समावेश होता.

अलीमुद्दीनने लिहिले, मी पीडीपीयूमध्ये शिकण्यासाठी 2008 मध्ये गुजरातला आलो. त्यावेळी गुजरातला येण्याच्या विचाराने आनंदी नव्हतो. माझ्या डोक्यात गुजरात म्हणजे दंगल आणि भूकंप होते. माझ्या मित्रांनी गुजरातपासून दूर राहण्यास सांगितले होते. परंतु मोदी सरांनी केलेली चर्चा आणि राज्याने माझी धारणा आणि मानसिकता बदलण्यात मदत केली.

अलीमुद्दीनने पुढे म्हटले आहे की, मार्च 2010 मध्ये वृत्तपत्र एसआयटी तपासाशी संबंधित बातम्यांनी भरलेली असतं, ज्यामुळे मला नरेंद्र मोदी सरांकडून स्वतःचं सत्य जाणण्याकडे आकर्षित केले आणि 1 एप्रिल 2010 ला माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पुस्तक लिहिलेल्या अलीमुद्दीनने ट्विट केले की, मोदी सरांनी आपल्या एका बैठकीत मला जे सांगितले ते मी कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, मी मुस्लिमांसाठी काहीही केलेले नाही. परंतु, लक्षात घ्या की मी हिंदू, जैन, शीख यांच्यासाठीसुद्धा काहीही केलेले नाही. मी 5.5 कोटी गुजराथींसाठी जबाबदार आहे, त्यांच्यासाठी करतो.

त्याने लिहिले, नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये मला एक मिनीटसुद्धा अस्वस्थ वाटले नाही. वातावरणात कोणतीही बेचैनी नव्हती. सर्वकाही ठीक होते. लोक मदत करणारे होते. वातावरणात शांतता जाणवत होती. माझ्या धर्मामुळेही कुणाला अडचण नव्हती. कॉलेजमध्ये दोन डझनपेक्षा जास्त कार्यक्रमाचे व्यवस्थापन, संचालन आणि स्पॉन्सरशिप मिळवण्याच्या दरम्यान मला लोकांना भेटण्यात कोणतीही समस्या आली नाही. माझे इंजिनियरिंगचे जीवन संस्मरणीय झाले.

त्याने पुढे लिहिले, माझ्या पुढील बैठकांच्या दरम्यान मोदी सरांनी सांगितले, त्यांची नजर पीडीपीयूला भारताच्या ऊर्जा उद्योगात एक जीवनरेखा बनवणे आहे. त्यांचे स्वप्न भारताला तेल आणि गॅस क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचे आहे.

सात वर्षे जुन्या एका भेटीचा उल्लेख करत अलीमुद्दीनने लिहिले, मोदी सरांनी डिसेंबर 2013 मध्ये मला जे सांगितले ते मी कधीही विसरणार नाही. त्यांनी म्हटले होते- पराभव मानू नका, कारण जग नेहमी तुमच्या मार्गात अडचणी आणत राहील. जर तुम्ही तुमची ओळख दीर्घकाळासाठी करणार असाल, तर अडचणींना मित्र बनवा. आपली स्वप्नं पूर्ण करा. सध्या युगात काहीही अशक्य नाही.

अलीमुद्दीनने लिहिले, आज मी एक प्रोफेशनल आहे, माझ्या करिअरमध्ये पुढे जात आहे. मी भारत आणि परदेशात दोन्ही ठिकाणी काम केले आहे. जागतिक स्तरावरसुद्धा भारताच्या प्रतिमेत बदल झाला आहे. मोदी सर खास का आहेत हे मी माझे पुस्तक ‘ऑन पॉईंट’मध्ये लिहिले आहे.

शनिवारच्या सोहळ्यात पीएम नरेंद्र मोदी यांनी 45 मेगावॅटची उत्पादन क्षमता असलेल्या मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनल आणि जल तंत्रज्ञानाच्या एका उत्कृष्ट केंद्राचे शिलापूजन केले. तसेच नवोन्मेषी केंद्र, वैद्यकीय संबंधी संशोधन केंद्र आणि खेळाच्या परिसराचेसुद्धा उद्घाटन केले. विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात 2600 विद्यार्थ्यांना त्यांची पदविका आणि पदवी प्रदान करण्यात आली.