Summer Diet | उन्हाळ्यात हिट कंट्रोल करून बॉडी हायड्रेट ठेवतात ‘हे’ 5 फूड, जाणून घ्या कोणते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या खाण्याच्या सवयींवर (Summer Diet) स्पष्टपणे दिसून येत आहे. उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे आणि शरीरातून घाम येऊ लागला आहे, अशा हवामानात शरीराला हायड्रेट (Hydrate) ठेवणे खूप गरजेचे आहे. बदलत्या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी (Summer Diet) फक्त पाण्याचे सेवन करणे पुरेसे नाही तर आहारात काही फळे (Fruits) आणि पेये (Drinks) घेणेही आवश्यक आहे.

 

आहारात फळे आणि ज्यूसचे (Juice) सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता तर पूर्ण होतेच, त्याचबरोबर स्नायू (Muscles) आणि सांधेही (Joints) चांगले काम करतात. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे शरीरातील डिहायड्रेशनचा धोका (Risk Of Dehydration) जास्त असतो. डिहायड्रेशनमुळे त्वचेच्या समस्या (Skin Problems) आणि डोकेदुखी (Headache) देखील होऊ शकते.

 

बदलत्या ऋतूमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात (Summer Diet) अशा काही पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात. अशा पाच पदार्थांविषयी जाणून घेवूयात जे शरीराला हायड्रेट ठेवतात (5 Foods to Keep you Hydrated in Summer).

 

1. हंगामी फळे खा (Eat Seasonal Fruits) :
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात मिळणारी सर्व फळे फायदेशीर असतात. खरबूज (Muskmelon), कलिंगड (Watermelon) ही अशी फळे आहेत जी शरीराला उष्णतेपासून वाचवतात, तसेच शरीर हायड्रेट ठेवतात. या फळांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा (Energy) मिळते तसेच शरीर हिट होत नाही.

 

2. पुदिन्याचे सेवन करा (Eat Mint) :
उन्हाळ्यात पुदिना शरीराला थंड ठेवतो आणि इम्युनिटीही (Immunity) मजबूत करतो. याचे सेवन केल्याने आजारांपासून बचाव होतो. थंड प्रभावाचा पुदिना (Mint) शरीराला थंड ठेवतो. याच्या सेवनाने पचनक्रियाही चांगली राहते.

3. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते (Coconut Water Keep Body Hydrated) :
प्रत्येक ऋतूमध्ये नारळपाणी (Coconut Water) सेवन करणे फायदेशीर आहे. नारळाचे पाणी उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते तसेच शरीराला ऊर्जा देते. इलेक्ट्रोलाइटने (Electrolyte) भरपूर असलेले नारळ पाणी उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते तसेच उष्णतेपासून संरक्षण करते.

 

4. कलिंगडचे सेवन करा (Eat Watermelon) :
उन्हाळ्यात स्वादिष्ट कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.
याचे सेवन केल्याने भूक लवकर लागत नाही आणि तहानही कमी लागते. उन्हाळ्यात टरबूजाचे सेवन केल्यास शरीराला उष्णतेपासून वाचवता येते.
मधुमेही रुग्णही (Diabetic Patients) कलिंगड खाऊन उष्णतेपासून बचाव करू शकतात.

 

5. दही करेल उष्णतेपासून संरक्षण (Beat The Heat With Curd) :
उन्हाळ्यात दही (Curd) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने पचनक्रिया (Digestion) बरोबर राहते आणि उष्णतेपासूनही शरीराचे रक्षण होते.
उन्हाळ्यात दही जेवणासोबत किंवा लस्सी बनवून सेवन करू शकता.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Summer Diet | these 5 foods can hydrate your body in summer and also beat the heat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Budget 2022 | अर्थमंत्री अजित पवार यांची पुण्यासाठी मोठी घोषणा ! 300 एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी

 

Mhada Exams Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 3500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

 

Kidney Cure | हाय बीपी, पोटात वेदना आणि सूज दिसून आली तर असू शकतो किडनीसंबंधी ‘हा’ गंभीर आजार; जाणून घ्या