Mhada Exams Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 3500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य विभागाचा (Maharashtra Health Department) पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर (Mhada Exams Paper Leak Case) कारवाई केली होती. म्हाडाच्या भरती परीक्षेअंतर्गत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. (G.A. Software Technology Pvt. Ltd.) कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख (Dr. Pritish Deshmukh) याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याचा (Mhada Exams Paper Leak Case) प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. (Pune Crime)

 

पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन डॉ. प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ (Agent Ankush Harkal), संतोष हरकळ (Santosh Harkal) या तिघांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (First Class Magistrate Shraddha Dolare) यांच्या न्यायालयात 3 हजार 500 पानांचे दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण 6 जणांना अटक (Arrest) केली आहे. देशमुख व हरकळ बंधू यांच्याशिवाय जमाल इब्राहिम पठाण Jamal Ibrahim Pathan (वय – 47 रा. जळकोट, लातूर), कलीम गुलशेर खान Kalim Gulsher Khan (वय – 52 रा. बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी Deepak Vikram Bhusari (वय-32 रा. बुलढाणा – Buldhana) आरोपींना अटक केली. म्हाडाचे वतीने गट अ,ब,क या पदांची परीक्षा घेण्यासाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीसोबत करार केला होता.

 

राज्यातील विविध शहरात तपास
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या (Health Department) पेपर फुटीचा तपास करत असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भातही सातत्याने माहिती समोर येत होती. यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी सांगितले की, म्हाडाचा पेपर फोडण्याची (Mhada Exams Paper Leak Case) काही लोक तयारी करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेऊन पथके तयार केली. पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे या ठिकाणी पथकांनी तपास केला. आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतले.

 

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आढळली

पोलिसांकडून तपास सुरु असताना सुरुवातीला औरंगाबाद मधील काही क्लासेस चालवणाऱ्या लोकांची भेट घेतली.
त्यांच्या मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या.
यामध्ये आरोग्य भरतीच्या पेपर संदर्भातही (Health Recruitment Paper) माहिती पोलिसांना मिळाली.
त्यांच्याकडे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे डॉक्युमेंट्सही आढळून आली.
यात परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अडमीटकार्ड आढळून आले. यातून ही माहिती समोर आली. पुढे हरकळ ब्रदर्सपण यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितिश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. देशमुख याच्याकडे लॅपटॉप होता, तसेच काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. याशिवाय काही पेनड्राईव्ह मिळाले होते.

 

Web Title :- Mhada Exams Paper Leak Case | mhada exam scam case 3 thousand 500 pages Chargesheet filed in First Class Magistrate Shraddha Dolare court pune cyber police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा