Summer Foods : उन्हाचा कडाका वाढल्यामुळं ‘हे’ 10 बेस्ट फूड्स खा अन् राहा ‘कूल’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फेब्रुवारी महिना संपल्यानंतर आता मार्च महिन्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. त्यानुसार आता तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्यात काही बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या काळात आहाराकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही आजारीही पडू शकता. या उन्हाळ्यात डिहायड्रेशन होते. त्यामुळे व्हिटॅमिन, मिनरल्स कमी होत जाते.

उन्हाळ्यात असे काही पदार्थ आहेत ते खाल्ल्याने तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला उन्हापासून होण्याऱ्या त्रासापासून सुटका मिळू शकते.

टमाटा – टमाट्यात अँटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात असते. तसेच लायकोपीन यांसारखे फायदेशीर फायटोकेमिकल्सही असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या क्रोनिक डिजिजलाही ठिक करण्यास मदत करतो.

घोसाळ्याची भाजी – उन्हाळ्यात घोसाळ्याची भाजी नक्की खावी. घोसाळ्यात पेक्टिन नावाचा फायबर असतो. त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉलही कमी करतो.

दही – प्रोटीनने भरपूर असलेले दही खाल्ल्याने उन्हाळ्यात याचा मोठा फायदा होतो. दहीमुळे तुमच्या शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होते. दहीमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे ते तुमचे पोट भरते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त काळापर्यंत भूक लागत नाही. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असते, या घटकामुळे पचनसंस्था ठिक ठेवते.

टरबूज – टरबूज उन्हाळ्यात शरीराला ठंड ठेवण्यास मदत करतो. तसेच यामुळे डिहायड्रेशनही दूर करण्याचे काम करतो. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे खाल्ल्यानंतर भूक लागत नाही.

संत्री – संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ते उन्हाळ्यात गरजेचे असते. उन्हाळ्यात घामाच्या माध्यमातून पोटॅशियम बाहेर काढले जाते. संत्री खाल्ल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण स्थिर राहते. संत्र्यामध्ये 80 टक्के रस असतो.

ब्लॅकबेरीज आणि रेस्पबेरीज – बेरीज फायबरचा चांगला स्त्रोत आहे. छोटासा दिसणाऱ्या बेरीमध्ये अनेक गुणकारी घटक आहे. तो एकप्रकारे खजिनाच आहे. हे व्हिटॅमिन C ने भरपूर असतो. एक कप बेरीजमध्ये 8 ग्रॅम फायबर मिळते.

सफरचंद, अंजीर आणि नाशपाती – सफरचंद, अंजीर आणि नाशपाती या तीन फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने ज्यादा पोषकतत्व मिळतात. त्यामुळे हे सालीसह खावे. मात्र, खाण्यापूर्वी चांगले धुवावे. दोन मध्यम आकाराच्या अंजीरमध्ये 1.5 ग्रॅम फायबर असते.

ग्रीन टी – उन्हाळ्याच्या दिवसात ग्रीन टी तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. ग्रीन टी कॅन्सरपासून लढतो. ह्रदयविकाराचा धोका कमी करते. कोलेस्ट्रॉल कमी करते. तुम्ही थंड करूनही ग्रीन टी पिऊ शकता.

कच्चे सलाड – हिरवी पाने असणाऱ्या भाज्यांचा सलाड चांगलाच फायदेशीर असते. नारंगी आणि हिरव्या रंगाच्या भाज्यात कॅरोटीनॉयड असते. ते शरीरात व्हिटॅमिन A बनवण्याचे काम करते. तसेच त्वचेला प्रखर उन्हापासून होणाऱ्या धोक्यापासून वाचवतो.

नट्स – उन्हाळ्यात मुठभर मेवा नक्की खावा. बदाम, काजू आणि शेंगदाण्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसेच्युरेटेड फॅट असते. यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.