Sunil Tatkare on Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांना भान नाही, त्यांचं वक्तव्य पोरकटपणाचं; अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sunil Tatkare on Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलत आहेत, याचं त्यांना भान नाही. त्यांचं वक्तव्य पोरकटपणाचं आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहेत. तसेच शरद पवारांना (Sharad Pawar) सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला (BJP) कोणता प्रस्ताव दिला आहे ना भाजपने आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिला आहे, असंही सुनील तटकरे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sunil Tatkare on Prithviraj Chavan)

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

माझ्या माहितीनुसार, शरद पवारांना केंद्रात कृषी खाते (Central Agriculture Department) आणि निती आयोगाचे चेअरमनपद (Niti Aayog) अशा दोन मोठ्या ऑफर अजित पवारांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु शरद पवारांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या असं त्यांनी सांगितलं. (Maharashtra Political News) अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा दोघांमध्ये बैठक झाली. शरद पवार यांना एनडीएकडे (NDA) वळवावे अशी यामागील भाजपची राजकीय रणनीती दिसून येत असल्याचे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांना भान नाही

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला कोणता प्रस्ताव दिला आहे ना भाजपने आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलत आहेत याचं त्यांना भान नाही. त्यांचे वक्तव्य पोरकटपणाचं आहे. (Sunil Tatkare on Prithviraj Chavan)

तसंच यावेळी सुनील तटकरे यांनी काँग्रेससह (Congress) ठाकरे गटातील (Thackeray Group) नेत्यांवरही जोरदार टीका
केली. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटातील काही नेते सध्या सभ्यता
सोडून बोलत आहेत. सध्या विरोधक संकुचित वृत्तीने टीका करत आहेत.

मलिक यांना जामीन मिळणं यात संबंध नाही

अजित पवार यांच्या गटाने नवाब मलिक (Nawab Malik) यांची भेट घेतली. या भेटीविषयी माहिती देताना सुनील तटकरे
म्हणाले, नवाब मलिक यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आम्ही भेटण्यासाठी गेलो
होतो. आम्ही भाजपसोबत जाणं आणि मलिक यांना जामीन मिळणं याचा दुरान्वये संबंध नाही, असं तटकरे यांनी सांगितले.

जयंत पाटील (Jayant Patil) त्याच्या भूमिकेबाबत स्वत: सांगतील, कसा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना चांगलं
माहिती आहे, असं सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Editors Guild Awards | ‘पिंपरी चिंववड एडिटर्स गिल्ड’कडून ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘लोकशाही मराठी’चे संपादक कमलेश सुतार, ‘एबीपी माझा’चे राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अव्दैत मेहता, न्यूज 18 लोकमतचे गोविंद वाकडे यांच्यासह राज्यातील 12 ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार जाहीर, शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार सन्मान