Sunil Tatkare | …त्यानंतरच आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात हे पाऊल उचलले, सुनील तटकरेंचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sunil Tatkare | निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल, पक्षांच्या बाबतीतले निर्णय या संदर्भात कायदेशीर माहिती घेऊनच आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात हे पाऊल उचलले आहे, असा खुलासा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच आम्ही ज्यावेळी हे पाऊल उचलले त्याचवेळी आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी होत जाईल. आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. (Sunil Tatkare)

सुनील तटकरे पुढे म्हणाले, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. तिला घटनात्मक दर्जा आहे. निवडणूक आयोगाकडे याचिका केली त्यामध्ये काही मागण्या केल्या आहेत त्या आज का सांगू, निवडणूक आयोगाच्या कोर्टात याचिका आहे. आयोगाकडून सुनावणी होईल. गुणवत्तेवर निकाल देईल. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुतीच्या सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला तो वैचारिक आणि कायद्याच्या दृष्टीने तपासून घेतला असून यावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होईल. तसेच निवडणूक आयोग आम्हाला उत्तर मागितल्यानंतर जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीत आम्ही त्यांच्याकडे उत्तर सादर करु असंही सुनील तटकरे यांनी सांगितले. (Sunil Tatkare)

काय आहे प्रकरण?

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित पवार गाटाने केलेले सगळे दावे फेटाळले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले 9 मंत्री आणि 31 आमदार अशा एकूण 40 आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाकडून खेळण्यात आलेल्या या खेळीनंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही कायदेशीर बाबीं तपासून शिंदे आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं विधान केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका