Sunny Leone | सनी लिओनी लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार नवा चित्रपट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री व डान्सर सनी लिओनी (Sunny Leone) हि तिच्या चित्रपटांमुळे व गाण्यांमुळे कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर ही सक्रीय असून ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती व लाईफ अपडेट शेअर करत असते. ती नुकतीच केनेडी या चित्रपटात झळकली होती. तिने या चित्रपटामध्ये चार्ली ही भूमिका साकारली होती. (Sunny Leone Movie) तिची भूमिका चित्रपट समीक्षकांना खूप भावली होती. सनीच्या या ‘केनेडी’ चित्रपटाला (Kennedy Movie) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) तब्बल सात मिनिटांचा स्टॅंडिंग ओव्हेशन मिळाला होता व अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) कौतुक देखील झाले होते. आता ती पुढच्या प्रोजेक्टवर काम करत असून तिने याबद्दल सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री सनी लिओनीचा मोठा चाहता वर्ग असून तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग देखील आहे. तिने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती घरी रिलेक्समध्ये बसली असून ती काहीतरी वाचत आहे. या फोटोमध्ये सनी कोणती तरी मोठी स्क्रिप्ट वाचत आहे. (Sunny Leone Upcoming Movie) हि स्क्रिप्ट नक्कीच चित्रपटाची असल्याची शक्यता नेटकरी व्यक्त करत आहेत. या फोटोला सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ती एक मोठी स्क्रिप्ट आहे, काही तरी छान होणार आहे!!!” असे लिहिले आहे. अभिनेत्री सनी लिओनी लवकरच तिच्या चाहत्यांसाठी मोठा व चांगला प्रोजेक्ट घेऊन येण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांनंतर अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Web Title :  Sunny Leone | sunny leone is preparing for an upcoming project hinted on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुण्यातील सराईत गुन्हेगार ‘सैरभैर’! पोलिसांवर हल्ला केल्यानंतर गुन्हे शाखेकडून फायरिंग, 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरचे झाले होते लहानपणी लैंगिक शोषण; कबीर सिंगच्या वादावर बोलताना दिली होती कबुली

Urvashi Rautela | अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटात न झळकताही एन्जॉय करते लक्झरी लाईफ