घरात असतानाही ‘सनस्क्रीन’ लावणे आवश्यक, ‘ही’ 4 कारणे जाणून घ्या, अन्यथा स्किनचे होईल ‘नुकसान’

पोलीसनामा ऑनलाइन – उन आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून स्किनचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमी सनस्क्रीनचा वापर करतो. घरातून बाहेर पडण्यापूवी 15 मिनिटे अगोदर चेहरा आणि हातांना सनस्क्रीन लावली पाहिजे, हे स्किनसाठी चांगले असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, घराच्या आतसुद्धा सूर्याची किरणे तुमच्या स्किनचे नुकसान करू शकतात. एक्सपर्ट सांगतात घरात असतानाही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अधुनिक काळात आपल्या चारही बाजूला गॅझेट्स असतात. घरी असो की बाहेर, सतत मोबाईल, लॅपटॉप, इत्यादी वस्तू आपल्या जवळपास असतात. या गॅझेट्समधून निघणार्‍या लहरी स्कीनचे नुकसान करतात. मोबाइल आणि लॅपटॉपचा डिजिटल प्रकाश स्किनचे नुकसान करत आहे.

हे लक्षात ठेवा

1 मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबमधून निघणारी निळी किरणे त्वचेला खुप हानिकारक असतात. सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांबद्दल आपल्याला माहित आहे पण गॅझेट्सच्या किरणांपासून होणारे नुकसाने अनेकांना महिती नसते.

2 गॅझेट्समधून निघणारी करणे स्किनचे नुकसान करतात. यापासून योग्यवेळी बचाव केला नाही तर वयाच्या अगोदरच वयस्करपणाची लक्षणे दिसू शकतात. या गॅझेट्समुळे सुरकुत्या, सैलपणा आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते.

3 गॅझेट्समधून निघणार्‍या किरणास निळ्या प्रकाशास हाय-एनर्जी व्हिजिबल लाईट म्हटले जाते. जे अल्ट्राव्हायलेट किरणांच्या तुलनेत अनेकपटीने त्वचेत खोलवर जातात. यापासून जास्त धोका असतो.

4 गॅझेट्सच्या हा दुष्परिणाम रोखण्यासाठी यावर ब्लू लाईट्स शील्डचा वापर करा. शिवाय घरात असताना सनस्क्रीनचा वापर करा.