Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Super Healthy Seeds | छोट्या दिसणारे हे सीड्स (बिया) आरोग्यासाठी खुप लाभदायक असतात. या बिया जर कच्च्या खाल्ल्या तर शरीराला जबदरस्त लाभ मिळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बियांमध्ये वेगवेगळी पोषकतत्व असतात. यांचा डाएटमध्ये सहज समावेश करता येतो. त्या सूप, स्मूदी, सलाडमध्ये टाकून खाऊ शकता किंवा केवळ पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता. या सुपर हेल्दी सीड्स (Super Healthy Seeds) बाबत जाणून घेवूयात…

1. चिया सीड्स / Chia Seeds –
चिया सीड्सला अनेक बाबतीत सुपर हेल्दी सीड्स म्हटले जाते. यामुळे पचन सुधारते, आयर्न, गुड फॅट आणि ओमेगा-3 मिळते. वेट लॉससाठी उपयोगी आहे. हे एक कार्बोहायड्रेट युक्त धान्य असून पाण्यात भिजवल्यावर हे फुलते. यात भरपूर फायबर असते जे बॉडी फंक्शनसाठी खुप आवश्यक आहे. चिया सीड्स रोज एक मोठा चमचा सेवन करू शकता.

2. फ्लेक्स सीड्स / Flax Seeds –
ब्लड प्रेशर कंट्रोल, डायजेशन सुधारणे अशा अनेक बाबतीत फ्लेक्स सीड्स म्हणजे आळशीचे बी उपयोगी आहे. यात डायटरी फायबर भरपूर असते आणि खाल्ल्यानंतर भूक लवकर लागत नाही. वजन वेगाने कमी होते. महिलांच्या अनियमित पीरियड्स आणि फर्टिलिटीच्या समस्यांमध्ये हे लाभदायक आहे. यात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी इन्फ्लामेट्री गुण असतात जे शरीराला अनेक प्रकारच्या आजारापासून वाचवतात.

 

3. हेम्प सीड्स / hemp seeds –

हेम्प सीड्सला भांगच्या बिया सुद्धा म्हणतात. अनेक आजारात यास नॅचरल अँटीडोट मानले जाते. हे अंतर्गत जखमा वेगाने भरून काढते. इम्यूनिटी खुप जास्त कमजोर आहे त्यांनी दररोज हेम्प सीड्स खाव्यात. या छोट्या बियांमध्ये प्रोटीन, ऑईल आणि 20 पेक्षा जास्त अमीनो अ‍ॅसिड आढळतात. यातील आवश्यक फॅटी अ‍ॅसिड हृदयाच्या आजारापासून दूर ठेवते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.

4. पंपकिन सीड्स / Pumpkin Seeds –
पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, प्रोटीन आणि झिंकसह अनेक पोषक तत्व असतात. यातील मिनरल्स हाडे मजबूत करतात. ऑस्टियोपोरोसिसपासून वाचवतात. या बिया ब्लड शुगर कंट्रोल करण्यात मदत करतात. दिवसभरात 3-4 चमचे बिया खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, यामुळे वजन कमी होते. पचनक्रिया सुधारते.

5. सेसम सीड्स / Sesame seeds –
सेसम सीड्स म्हणजे तिळाच्या सफेद-काळ्या बियांमध्ये पोटॅशियम,
हार्मोन नियंत्रित करणारे मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर असते.
यामध्ये कॅलरीज खुप कमी मात्रेत असतात. यासाठी वजन कमी करण्यात उपयोगी आहे.
हे उष्ण असल्याने आयुर्वेदात याचा वापर जास्त केला जातो.

6. सनफ्लॉवर सीड्स / Sunflower Seeds –
सनफ्लावर सीड्स म्हणजेच सूर्यफुलाच्या बियांमध्ये 100 विविध प्रकारचे एंजाइम असतात,
जे हार्मोनल संतुलन नियंत्रित करतात.
यातील एंजाइम बॉडीत एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन संतुलित पद्धतीने बनवतात
ज्यामुळे पीरियड्सच्या समस्या आणि थायरॉईडमध्ये आराम मिळतो.
सनफ्लॉवर सीड्स प्रेग्नंसीमध्ये येणारा थकवा दूर करतात.

Web Title :- Super Healthy Seeds | health fitness top 6 healthiest edible seeds to add to your diet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही?

Pune Ganeshotsav | पुणेकरांना गणेशोत्सवासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Pune Crime | पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकावर (API) बलात्काराचा गुन्हा दाखल