धक्कादायक माहिती उजेडात ! ‘या’ कारणामुळं सेंट जॉर्जचे अधीक्षक रूग्णवाहिकेतून करतात प्रवास

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मधुकर गायकवाड यांची तीन वर्षापूर्वी रुग्णालय अधीक्षकपदावर नेमणूक झाली राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड हे रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर कामावरुन घरी जाण्यासाठी आणि शासकीय कामासाठी वापरत असल्याचं ड्रायव्हरच्या डायरीतून उघड डॉ. मधुकर गायकवाड यांनी आतापर्यंत तब्बल २४० वेळा वैयक्तिक कामासाठी आणि ९० वेळा शासकीय कामासाठी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर केला आहे. गेल्यावर्षी २५ वेळा त्यांनी एकट्याने रुग्णवाहिका वापरली आहे. रुग्णालयाच्या चारही रुग्णवाहिका मधुकर गायकवाड वापरत असल्याचं समोर आलं आहे.

 

कधीकधी मला ऐनवेळी बैठकीला येण्यासाठी बोलावलं जातं. त्यावेळी जर मी रुग्णवाहिकेत असेन तर वाहतूक कोंडीत अडकत नाही, इतर वाहनचालकही सहकार्य करतात. शहराच्या वाहतूक कोंडीतून जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. असे मधुकर गायकवाड यांनी संगितले त्यानी मी कधीही वयक्तिक कामासाठी वापर केलं नसल्यचा ते स्पष्टीकरण देत आहेत .

रुग्णालयाच्या लॉगबुकमध्ये ‘अधीक्षकसाहेबांना घरी सोडण्यात आले, अधीक्षक साहेबांना कोर्टात घेऊन गेलो, अधीक्षकसाहेबांना जे.जे हॉस्पिटलमध्ये मिटींगसाठी घेऊन गेलो आणि आलो अशाप्रकारच्या नोंदी रुग्णवाहिकेच्या वापराबाबत आढळतात. पण, रुग्णवाहिकेची खरी गरज ही रुग्णांना असते, मधुकर गायकवाड यांच्यासाठी प्राधान्य नसावं असं काही जणांचे म्हणने आहे. यातील दोन रुग्णवाहिका स्वयंसेवी संस्थांकडून गरिब रुग्णांसाठी मदत म्हणून पुरवण्यात आल्या आहेत.

डॉ. गायकवाड यांनी रुग्णवाहिकेचा वापर करुन प्रवास भत्ता मागितला आहे का याचा तपास केला जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय प्रमुख डॉ. टी. पी. लहाने यांनी दिली . अशाप्रकारे समाजसेवक संजय गुरव यांनी रुग्णवाहिकेचा वापर करणं कायदेशीर गुन्हा आहे असं मत व्यक्त आहे.

You might also like