Supreme Court – Aurangabad | सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Supreme Court – Aurangabad | राज्य सरकारकडून सध्या औरंगाबादचे (Aurangabad News) नामांतरण ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) करण्यात आले आहे. हा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court – Aurangabad) दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली न्या.पी.एस.नरसिम्हा (Justice PS Narasimha) आणि न्या.जे.बी.पारडीवाला (Justice JB Pardiwala) यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमक्ष हि याचिका सुचीबद्ध करण्यात आली होती.

4 मार्च 2020 रोजी विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांनी औरंगाबाद (Supreme Court – Aurangabad) शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे अशा आशयाचे प्रस्ताव दिला होता. या पत्राला केंद्र तसेच राज्य सरकारने मंजुरी दिली होती. आता या मंजुरीला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ अधिवक्ते बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) हे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय 27 मार्च 2023 ला सुनावणी घेणार आहे, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळली.

यापूर्वी देखील याचिकाकर्ते मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी 1996 मध्ये औरंगाबादच्या नामांतराच्या प्रयत्नाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्यावेळी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
मात्र केंद्र सरकारने न्यायालयाचे निर्देश फेटाळून नामांतराच्या प्रक्रियेला मंजुरी दिली असल्याचा दावा आता
दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका
फेटाळल्याने सोमवारी उच्च न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे सरकारचे व याचिकाकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title :- Supreme Court – Aurangabad | supreme-court-today-date-
24-dismissed-a-petition-challenging-for-changing-the-name-of-aurangabad
-to-chhatrapati-sambhajinagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | सांगली-माहीमच्या कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘हे अतिक्रमण नाही तर…’

Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही
– मंत्री उदय सामंत

Maharashtra Industries Minister Uday Samant On Cidco Land | सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा – मंत्री उदय सामंत

Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान