Bad News : फोनवर बोलणं महागणार ! टेलिकॉम सर्विसेस १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम सर्विसेस किमान १० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात. इंडस्ट्रीच्या माहितीनुसार पुढील सात महिन्यांत एअरटेल आणि वोडाफोन अजस्ट साठी करण्यात आलेल्या ग्रॉस रिवेन्यूचे १० टक्के द्यावे लागणार आहेत. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी टेलिकॉम ऑपरेटर्सला ३१ मार्च २०२१ पर्यंत अजस्ट करण्यात आलेल्या ग्रॉस रिवेन्यूचे १० टक्के भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने बाकी रक्कम ३१ मार्च २०२२ पर्यंत १० वेगवेगळ्या भागात देण्याचा निर्णयदेखील दिलेला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता मार्च २०२१ पर्यंत एअरटेलला २६०० कोटी आणि वोडाफोन आयडियाला ५०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ब्रोकरेज फर्म Jefferies च्या माहितीनुसार, एअरटेल आपल्या साधारणपणे रिवेन्यू प्रति युजरला १० टक्के आणि वोडाफोन २७ टक्के वाढविण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एअरटेलसाठी ARPU (प्रति यूजर रेवेन्यू) १५७ रुपये होता. तर वोडाफोन-आयडियासाठी १४४ रुपये होता. जेफरीजने म्हटले की, कंपन्या टॅरिफला एकवेळ आणि १० टक्के महाग करू शकते.

एंटरप्रेन्योर आणि टीएमटी अडव्हायझर संजय कपूर यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी आलेला निर्णय टेलिकॉम कंपन्यांकडून करण्यात आलेल्या प्राईसपेक्षा वेगळा आहे. यात केवळ भविष्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतेवर जोर देण्याचे काम केले आहे. कपूर यांनी पुढे सांगितले की, स्पेक्ट्रम कॉस्ट आणि दुसऱ्या गुंतवणूकीसाठी वेगळे ठेवले जावू शकते. तर सर्विस प्रोव्हाईडर्सला डेटा युसेज वाढवण्यासाठी मागणी पूर्ण करण्यासाठी कमीत कमी ३ ते ४ डॉलर प्रति युजर रिवेन्यूची गरज पडणार आहे. त्यामुळे पुढील तिमाहीपर्यंत टॅरिफ रेटमध्ये आवश्यक वाढ होऊ शकते. टेलिकॉम ऑपरेटर्सने चार वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्लानला ४० टक्क्यांपर्यंत महाग केले होते. २०२० च्या पहिल्या सहामाहीत कंपन्यांची कमाई २० टक्के वाढ पाहिली गेली आहे. यासंबंधी Analysys Mason च्या इंडिया आणि मिडिल इस्ट हेड रोहम धमीजा यांनी म्हटले की, आम्हाला वाटते की, १२-२४ महिन्यात टेलिकॉम कंपन्यांना २०० रुपये प्रति युजर रिवेन्यूची आवश्यकता आहे.