निर्भया केस : सुप्रीम कोर्टानं दोषी मुकेशची याचिका फेटाळली, वकिलाविरूध्द कारवाईची केली होती मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेश याने वरिष्ठ अधिवक्ता वृंदा ग्रोव्हरवर कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी केली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की मुकेश याची याचिका व्यवहार्य नाही. वृंदा ग्रोव्हर यांनी सुरुवातीला मुकेशच्या खटल्याची बाजू मांडली होती. २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात मुकेशला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात वकील वृंदा ग्रोव्हरच्या विरोधात दाखल केलेली याचिका फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थांबविण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. मुकेशने वृंदा ग्रोव्हरवर गुन्हेगारी कट रचण्याचा आणि फसवणूकीचा आरोप देखील केला होता. तसेच मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी देखील केली होती. तथापि, पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही दोषींवर नवीन डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार त्याला २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे.

या प्रकरणास मनोरंजक वळण :
या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात इच्छामृत्यूची मागणी केली आहे. राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्यांत दोषी, त्यांचे वृद्ध पालक, त्यांची मुले व त्यांच्या भावंडांचा समावेश आहे.

राष्ट्रपती आणि निर्भयाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली ही मागणी :
निर्भयाच्या दोषींच्या नातेवाईकांनी हे पत्र हिंदीमध्ये लिहिले आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती आणि पीडितेच्या पालकांना निवेदन केले आहे की आम्हाला इच्छामृत्यू परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. यामध्ये असेही म्हटले आहे की आम्हाला इच्छामृत्यू दिल्याने भविष्यात होणाऱ्या कोणत्याही गुन्ह्यास रोखता येऊ शकते. यात असे लिहिले आहे की आमच्या संपूर्ण कुटूंबाला जर इच्छामृत्यू परवानगी देण्यात आली तर निर्भयासारखी दुसरी घटना होण्यापासून रोखता येईल.