Supreme Court on MP OBC Reservation | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court on MP OBC Reservation | मागील काही दिवसापुर्वी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला (Madhya Pradesh Government) झटका दिला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज (बुधवारी) ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली होती. आज देखील सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. (Supreme Court on MP OBC Reservation)

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका होणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले आहेत. ओबीसींना 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याने राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.
आणि खरंतर मध्य प्रदेश राज्यात ओबीसींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Web Title :- Supreme Court on MP OBC Reservation | supreme court gives green signal to obc reservation in local elections in madhya pradesh obc reservation news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा