Supreme Court | अविवाहित किंवा विधवा मुलीलाच अनुकंपा खाली होणार्‍या नियुक्तीसाठी अवलंबित मानले जाईल – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी निर्णय दिला की, कर्नाटकच्या एका कायद्यांतर्गत एखाद्या सरकारी कर्मचार्‍याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यावर अवलंबित असलेली आणि त्याच्या सोबत राहणारी ‘अविवाहित मुलगी’ किंवा ‘विधवा मुलीला’च त्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र आणि अवलंबित म्हटले जाऊ शकते. (only unmarried or widowed daughter will be considered dependent for compassionate appointment says supreme court)

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सिव्हिल सेवा (अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती) नियम, 1996 ची पडताळणी करताना हा निर्णय सुनावला आणि म्हटले की, यामध्ये अनुकंपा तत्त्वावर आधारित नियुक्तीसाठी ‘घटस्फोटीत मुली’चा समावेश केलेला नाही आणि सुधारणा 2021 मध्ये जोडले गेले आहे.

न्यायमूर्ती एम. आर. शाह (Justice M. R. Shah) आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस (Justice Aniruddha Bose) यांच्या पीठाने म्हटले की, राज्य सरकारच्या सेवेत कोणत्याही पदावर नियुक्ती संविधानाचे कलम 14 आणि 16 च्या आधारावर करावी लागते आणि अनुकंपा खाली होणार्‍या नियुक्ती सामान्य नियमांसाठी अपवाद आहे.

खंडपीठाने म्हटले की, एखाद्या कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवलंबिताना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती धोरणांतर्गत पात्र मानले जाते आणि त्यास राज्य सरकारच्या धोरणात ठरलेल्या नियमाचे पालन करावे लागते.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) कर्नाटक उच्च न्यायालयाचा (High Court, Karnataka) एक निर्णय रद्द करत ही टिप्पणी केली.
न्यायालयाने या मुद्द्यावर कर्नाटक राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण, बेंगळुरूचा आदेश रद्द केला होता.
उच्च न्यायालयाने कर्नाटकमध्ये कोषागार संचालक आणि इतरांना निर्देश दिले होते की, अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी एका ‘घटस्फोटीत मुली’च्या अर्जावर विचार केला जावा.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कर्नाटक सिव्हिल सेवा (अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती) नियम 1996 च्या नियम दोन आणि तीनमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी घटस्फोटीत मुलीचा पात्र म्हणून किंवा अवलंबित म्हणून समावेश केलेला नाही.

हे देखील वाचा

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Supreme Court | only unmarried or widowed daughter will be considered dependent for compassionate appointment says supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update