Supreme Court | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Self Government Elections) आणखी लांबणीवर पडल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची (OBC Reservation) पुढील सुनावणी दिवाळीनंतर 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर अखेर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यातील एकूण 11 महपालिकांची (Municipal Corporation) मुदत 15 मार्च 2022 रोजी संपली आहे. तसेच पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. राज्यातील 25 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तसेच दोन डझनहून अधिक जिल्हापरिषदांचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरु आहे.

ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court)
प्रलंबित आहे. यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत. लवकरात लवकर सुनावणी होऊन या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र, आता याप्रकरणाची सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

या प्रकरणावर 20 सप्टेंबर रोजीच सुनावणी होणाीर होती. पण त्यावेळी ही सुनावणी होऊ शकली नाही.
आता तर थेट या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राज्यात रखडलेल्या निवडणुकांचे खापर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर फोडत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kondhwa News | ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांकडून कोंढवा परिसरातील वाहतुकीचे व्यवस्थापन

Ajit Pawar-Chandrakant Patil | पुणे जिल्हयाच्या पालकमंत्री पदी अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्याकडे या जिल्हयांचे पालकमंत्री पद

Pune Crime News | फ्रॅन्चायजी घेण्यासाठी गुगलचा घेतला आधार अन् गमावून बसले 10 लाख; पुण्यात कंपनी असताना केला व्यवहार अंधेरीत