Supriya Sule In Parliament | ‘संसदेमध्ये माझे 800 भाऊ’ ! नाव न घेता सुप्रिया सुळेंनी यावेळीही संसदीय भाषण गाजवलं

पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule In Parliament | सध्या दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर (NCP) घोटाळे केले असा आरोप असेल तर चौकशी व्हावी अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे (Supriya Sule In Parliament). इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चॅलेंज देत आरोप सिद्ध करण्यास सांगितले होते. भाजपाकडून सातत्याने घराणेशाही व भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येतो. यावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवारांनी थेट चौकशी करा असे आव्हान दिले होते. शरद पवारांची हीच बाजू संसदेमध्ये सुप्रिया सुळेंनी मांडली आहे. विशेष अधिवेशनात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसने जर भ्रष्टाचार केला असेल, तर सखोल चौकशी करा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत थेट संसदेतून खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला (Modi Govt) चॅलेंज दिले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या आपल्या संसदीय भाषणासाठी नावाजल्या जातात. पंतप्रधान मोदींनी भाषणामध्ये सहकार आणि इरिगेशनचा उल्लेख केला होता. आता या आरोपावर मोदी सरकारने चौकशी करावी अशी मागणी राज्यातून शरद पवार तर संसदमधून सुप्रिया सुळे करत आहेत. यामागचे कारण म्हणजे मोदींनी असा उल्लेख केला तेव्हा या दोन्ही खात्यांचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे याची चौकशी कराच अशी मागणी शरद पवार गटाकडून केली जात आहे. कारण यामध्ये सध्या भाजपासोबत युतीमध्ये असणारे अजित पवार हे अडचणीमध्ये येणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून अजित पवार यांना कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न तसेच भाजपाला शह देण्याचे काम सुरु असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. (Supriya Sule In Parliament)

संसदेतील भाषणात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आल्यानंतर भ्रष्टाचाराचा
मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, एनसीपी म्हणजे ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा
साधला होता. इरिगेशन घोटाळा, बँक घोटाळ्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं होते.
मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की, पंतप्रधानाची इच्छा तुम्ही पूर्ण करावी, आमचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे.
केवळ दोनच नाही, तर आणखी चार जसे एपीएमसी वगैरे अशा घोटाळ्याचेही आरोप आहेत.
इथे नात्याचा मुद्दा नाही, कारण, संसदेत माझे 800 भाऊ आहेत.”
असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं नाव न घेता संसदेमध्ये आपलं भाषण गाजवलं आहे.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

19 September Rashifal : वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांसाठी दिवस धावपळीचा, वाचा दैनिक भविष्य

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून