Supriya Sule | नाव न घेता सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला; म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | हयात असताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. असे असून देखील आज शिवसेना तोडण्याचे, फोडण्याचे आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचाच अर्थ तुम्ही स्वर्गीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नाव न घेता लगावला. (Supriya Sule)

 

आज पुणे येथे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे पाच वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी असून हे बाळासाहेबांना न आवडणारे आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावर उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे हयात असताना निवड झाली. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून तेव्हाच त्यांची निवड करण्यात आली. मात्र, असे असताना देखील शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांनाच विरोध करताय का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपमध्ये सातत्याने अपमान होत आहे का? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर त्यांना अपमान चालत असेल तर आपण काय म्हणायचे. अशी टीका केली.

 

दरम्यान, पुण्यातील कात्रज (Katraj Traffic Chaos) परिसरात होत असलेल्या वाहतुक कोंडीची पाहणी करण्यासाठी त्या शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे वाहतूकीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा. अशा सुचना यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिल्या.

 

Web Title :- Supriya Sule | ncp mp supriya sule criticizes cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका