हैदराबाद गँगरेपनंतर ‘या’ अ‍ॅपला 1.3 लाख लोकांनी केलं डाऊनलोड, ‘असा’ करा वापर

पोलीसनामा ऑनलाईन : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात एकच खळबल उडाली होती. देशातील महिला सुरक्षिततेच्या मुद्यावरून संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनेनंतर आता आपल्या सुरक्षिततेसाठी १.३ लाख लोकांनी (SURAKSHA-Bengaluru City Police) हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. बेंगळुरू पोलिसांनी सुरू केलेले हे अ‍ॅप विनामूल्य डाउनलोड करता येते.

बेंगलुरूचे पोलिस उपायुक्त कुलदीप जैन यांनी सांगिल्याप्रमाणे, सामूहिक बलात्कारानंतर हे अ‍ॅप खूप जलद डाउनलोड केले गेले आहे. या सुरक्षा अ‍ॅपला केवळ सात सेकंदात प्रतिसाद दिला जातो, असा दावा पोलिसांनी केला आहे. यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दोन पेट्रोलिंग वाहने तैनात करण्यात आली आहेत, जे अ‍ॅपवर आलेल्या आपत्कालीन क्रमांकावर त्वरित कारवाई करतील. ५.८ एमबी हा या सिक्युरिटी अ‍ॅपचा आकार आहे.

कोणतीही व्यक्ती करू शकणार उपयोग :
‘सुरक्षा’ अ‍ॅपचा वापर महिला, पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती सहजपणे करू शकते. ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळू शकेल. या अ‍ॅपचा वापर करताना आपल्याला आपले नाव आणि मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागेल. यानंतर ओटीपीची पडताळणी करावी लागेल. यानंतर आपत्कालीन नंबर सेव्ह करावे लागेल जेणेकरून आपल्या कुटुंबातील सदस्यांना संपर्क करता येईल.

आपत्कालीन परिस्थितीत, SOS लाल बटण दाबावे लागेल, तर रद्द करण्यासाठी SOS चे ग्रीन बटण दाबावे लागेल. या अ‍ॅपद्वारे आपण पोलिसांना १० सेकंदापर्यंतचे व्हिडिओ देखील पाठवू शकता. त्याच वेळी, आपत्कालीन बटण सक्रिय करण्यासाठी, फोनची पॉवर बटण सलग ५ वेळा दाबावी लागेल. या अ‍ॅपमध्ये रिअल टाइम जीपीएस ट्रॅकर देखील आहे ज्याच्या सहाय्याने पोलिस आपल्याला रिअल टाइममध्ये ट्रॅक करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/