#Surgicalstrike2 : पाकला चकवण्यासाठी भारतीय विमानांचे २० हवाई तळांवरून उड्डाणे

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तानला चकवण्यासाठी ग्वाल्हेर, अंबाला, भटिंडासह  २० हवाई तळांवरून उड्डाण भरले. यावेळी ड्रोनचाही वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय विमानांनी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशचे तळ उध्वस्त केले. तर या हवाई हल्ल्यात २०० ते २५० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१४ फेब्रुवारी रोजी जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आयईडीने भरलेली कार आदळली. त्या स्फोटात भारताचे ४० जवान शहिद झाले होते. त्यानंतर देशातून संतापाची लाट उसळली होती. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने आज सर्जिकल स्ट्रईक केली आहे.

भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या विमानांनी देशातील ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला यांच्यासह २० हवाई तळांवरून उड्डाण भरले. त्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील बालकोट येथील जैशच्या अड्ड्यांवर १ हजार किलोच्या बॉम्बेचा वर्षाव करून जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त केली. तर २०० ते २५० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची दाट शक्यता  व्यक्त करण्यात आली आहे.